पुलवामा (जम्मू-काश्मिर) - दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील द्राबगाम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. गेल्या चोवीस तासांत दक्षिण काश्मीरमधील ही दुसरी चकमक आहे. यादरम्यान लष्कराने तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी ही माहिती दिली. काल रात्री खांदेपोरा कुलगाममध्ये चकमक झाली, ज्यामध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा एक दहशतवादी मारला गेला. दोन्ही बाजूंनी अजूनही गोळीबार सुरू आहे.
Pulwama Encounter: पुलवामा येथे चकमक; सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांचा केला खात्मा - पुलवामामध्ये तीन दहशतवादी ठार
दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील द्राबगाम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यादरम्यान चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत.
Pulwama Encounter
दरम्यान, शनिवारी सकाळी उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमधील पुतखा भागात सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी दहशतवाद्यांनी आयईडी टाकला होता. मात्र सतर्क सुरक्षा कर्मचाऱ्यांना दहशतवाद्यांच्या या कारवाईची माहिती आधीच लागली. यावर त्यांनी तातडीने रस्त्यावर पडलेला आयईडी शोधून काढला आणि नंतर बॉम्ब निकामी पथकाला माहिती दिल्यानंतर तो निष्क्रिय केला.
हेही वाचा -Sonia Gandhi In Hospital: सोनीया गांधी यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल