महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नागपूर : नवनिर्माणाधीन पूलाचा काही भाग कोसळला

big breaking news
big breaking news

By

Published : Oct 19, 2021, 7:02 AM IST

Updated : Oct 19, 2021, 10:55 PM IST

22:52 October 19

नागपूर : नवनिर्माणाधीन पूलाचा काही भाग कोसळला

नागपूर शहरातील भंडारा मार्गावर असलेल्या पारडी परिसरात नवनिर्माणाधीन पूलाचा काही भाग कोसळला

प्राथमिक माहिती नुसार जीवितहानी नाही

घटनास्थळी कळमना आणि पारडी पोलिसांचे पथक दाखल

22:38 October 19

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली 'सीरम'ला भेट

पुणे -सीरमने भारतातील कोविड लसीकरण मोहिमेत महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त केली. आम्ही पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आपल्या नागरिकांचे 100 कोटी लसीकरण साध्य करण्याच्या मार्गावर आहोत, असे केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार म्हणाल्या. त्यांनी आज सीरमला भेट दिली.

19:39 October 19

यंदा उसाला 3300 रुपये उचल देण्याची राजू शेट्टींची मागणी

कोल्हापूर -  यंदा उसाला 3300 रुपये उचल देण्याची राजू शेट्टींची मागणी आहे. यापैकी एकरकमी एफआरपी देऊन उर्वरीत रक्कम पुढच्या मार्च महिन्यापर्यंत द्यावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी आजच्या ऊस परिषदेत केली आहे.  

18:17 October 19

शर्लिन चोप्राविरोधात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राकडून 50 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

मुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांनी शर्लिन चोप्राविरोधात 50 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.

17:47 October 19

साखर कारखान्यांशी संबंधित समस्यांवर अमित शाह आणि फडणवीस यांच्यात बैठक

नवी दिल्ली -केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासोबत साखर कारखान्यांशी संबंधित समस्यांवर बैठक घेतली. साखर कारखान्याच्या प्रतिनिधींसह एकूण 14 लोकांनी बैठकीत भाग घेतला.

15:29 October 19

राज्यातील हॉटेल रात्री 12 तर दुकाने रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी

मुंबई -राज्यातील सर्व उपाहारगृहे, हॉटेल्स रात्री १२ वाजेपर्यंत, तर सर्व प्रकारची दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य शासनाची परवानगी दिली आहे. राज्य शासनाची यासंदर्भातील कार्यपद्धती व नियम जाहीर केले आहेत.

14:03 October 19

उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेस महिलांना ४० टक्के तिकीटे देणार - प्रियंका गांधी

काँग्रेस पक्षाचा निर्णय

उत्तर प्रदेश राज्यातील एकूण निवडणूक तिकीटांपैकी 40% महिलांना तिकीटे देणार

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांचे 2022 उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवर मोठे भाष्य

12:20 October 19

कल्याणमधील एका डान्स बारमध्ये जोरदार राडा

कल्याणमधील एका डान्स बारमध्ये जोरदार राडा झाला आहे. यामधील 7 ते 8 राडेबाजांवर महात्मा फुले ठाण्यात विविध कलमांसह आर्म एक्ट्नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सर्व टिटवाळा परिसरात राहणारे असून त्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

11:26 October 19

कोरोना नियमांचे पालन करून 'ईद-ए-मिलाद' साजरी करा - मुख्यमंत्री

मुंबई- ईद-ए-मिलाद अर्थात प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मोत्सवाच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच ईद-ए-मिलादाचा उत्सव साजरा करताना कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. हजरत पैगंबर यांनी मानव कल्याणाचा मार्ग दाखविला. त्यांनी दिलेल्या शिकवणीला अनुसरून परस्परांचा आदर करूया, स्नेह वृद्धिंगत करूया. उत्सव साजरा करताना एकमेकांच्या आरोग्याचीही काळजी घेऊया. यातून प्रेषितांना अभिप्रेत समाज निर्माण होईल, सुख, समृद्धी नांदेल. त्यासाठी ईद-ए-मिलादाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

10:33 October 19

मंदाकिनी खडसे ईडी कार्यालयात हजर, तपासात पूर्ण सहकार्य करणार - तळेकर

माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे ईडी कार्यालयात हजर झाल्या आहेत. त्या तपास कार्यामध्ये संपूर्ण सहकार्य करतील असे त्यांचे वकील मोहन तळेकर यांनी स्पष्ट केले आहे.

09:17 October 19

पुणे जमीन घोटाळाप्रकरणी मंदाकिनी खडसे ईडी कार्यालयात हजर होणार

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची पत्नी मंदाकिनी खडसे आज पुणे जमीन घोटाळ्याशी संबंधित प्रकरणाच्या चौकशीसाठी ईडी कार्यालयासमोर हजर होणार असल्याचे अंमलबजावणी संचालनालयाने सांगितले.

08:53 October 19

मुंबईतील दहिसर टोल नाकावर कामगारांनी टॅक्सीच्या काचा फोडल्या

दहिसर टोलनाक्यावर रात्री उशिरा टोल कामगारांनी टॅक्सी चालकाशी वाद घातला. टॅक्सी चालकाशी वाद झाल्यानंतर टॅक्सी चालक आणि टोल कामगारांमध्ये भांडण झाले आणि नंतर टोल कामगारांनी टॅक्सीच्या काचा फोडल्या. सध्या टोल कर्मचारी आणि टॅक्सी चालक यांच्यात काय घडले आणि टोल कर्मचाऱ्यांनी टॅक्सीची काच का तोडली याचा तपास आता दहिसर पोलीस करत आहेत.

06:57 October 19

अखेर बिबट्या जेरबंद : नाशिकच्या अडगाव शिवारात घातला होता धुमाकुळ

नाशिक - जिल्ह्यातील अडगाव शिवारात मागील काही दिवसांपासून धुमाकुळ घालत असलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. काही दिवसापूर्वी या बिबट्याने एका व्यक्तीची शिकार केली होती. तसेच बिबट्याच्या डीएनएचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याचे वनअधिकाऱ्यांनी सांगितले.

06:48 October 19

Breaking - हिजाब घातलेल्या महिलेला रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारला; व्हिडिओ व्हायरल

मुंबई - दक्षिण मुंबईतील वरळी येथील ॲट्रीया मॉलमधील रेस्टो बार टॅप येथील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रेस्टो बार टॅप या रेस्टॉरंटमध्ये हिजाब घातलेल्या महिलांना प्रवेश नाकारल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे ही धक्कादायक घटना उजेडात आली.  २ मिनिटांच्या या क्लिपमध्ये रेस्टॉरंटचा दुसरा कर्मचारी महिलेला असं सांगत आहे की, रेस्टॉरंटमध्ये साड्या नेसून येणाऱ्या महिलांना देखील आम्ही परवानगी देत नाही. पुढे हिजाब घातलेल्या महिलेचा मित्र असंही म्हणत आहे की, "रेस्टॉरंटमध्ये भारतीय पोशाखांना परवानगी नाही, भारतात भारतीय पेहराव घालायचा नाही.'' हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्याच्या रेस्टॉरंटच्या या अटीबद्दल नेटिझन्सने असंतोष व्यक्त केला आहे.

Last Updated : Oct 19, 2021, 10:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details