मुंबई भारताला क्रिडा क्षेत्रात नव्या उंचीवर पोहोचवण्यासाठी अनेक खेळांडूनी अथक प्रयत्न केले ( Indian players ). त्यामुळेक्रिडा क्षेत्रात भारताने स्वत:ची नवी ओळख निर्माण केलीआहे( Excellent performance for the country ) . यात क्रिकेटमध्ये कपील देव, धावपटू मिल्खा सिंग, नेमबाजीत अभिनव बिंद्रा,भालाफेकपटू नीरज चोप्रा, कुस्तीपटू सुशील कुमार यांच्यासारख्या अन्य खेळाडूंचा मोठा समावेश आहे. भारत स्वतंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करत आहे. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्यवानिमित्त
मिल्खा सिंग मिल्खा सिंग ( Milkha Singh ) यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1929 रोजी गोविंदपूर येथे एका शीख जाट कुटुंबात झाला. फाळणीनंतर गोविंदपूर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात विभागून गेले आहेत. मात्र तरीही पाकिस्तानातून रेल्वेने भारतात आले. अशा भयंकर बालपणानंतर त्याने आयुष्यात काहीतरी करायचे ठरवले. मिल्खा सिंग यांची सैन्यात भरती होण्याची इच्छा होती. 1952 मध्ये ते सैन्याच्या इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनीअरिंग शाखेत रुजू झाले. 1956 मध्ये पटियाला येथे झालेल्या राष्ट्रीय खेळापासून ते प्रसिद्धीच्या झोतात आले. धावपटू म्हणून नावलौकिक मिळविला. निवृत्तीनंतर मिल्खा सिंग पंजाबच्या क्रीडा संचालक पदावर होते. मिल्खा सिंग यांनी नंतर यातून निवृत्ती घेतली आणि भारत सरकारसोबत खेळाच्या संवर्धनासाठी काम करण्यास सुरुवात केली. ते चंदिगडमध्ये राहत होते. सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी 2013 साली भाग मिल्खा भाग नावाचा चित्रपट बनवला होता. हा चित्रपट खूप गाजला. 1958 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मिल्खा सिंग यांनी 200 मीटर आणि 400 मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले. 1958 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक तर आशियाई क्रीडा स्पर्धेतील 400 मीटर शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावले होते. त्यांनी क्रिडा क्षेत्रात केलेल्या योगदानामुळे त्यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1962 आशियाई क्रीडा स्पर्धेतील 400 मीटर शर्यतीत प्रथम, 1962 आशियाई खेळांच्या रिले शर्यतीत प्रथम, 1964 कलकत्ता नॅशनल गेम्समधील 400 मीटर शर्यतीत दुसरे स्थान पटकावले होते. मृत्यू मिल्खा सिंग यांनी 18 जून 2021 रोजी PGIMER हॉस्पिटल, चंदीगड येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांना कोरोना संसर्ग झाला होता. त्याच्या मृत्यूच्या चार-पाच दिवस आधी त्यांच्या पत्नीचाही कोरोनामुळे मृत्यू झाला होता.
अभिनव बिंद्रा अभिनव बिंद्रा ( Shooter Abahinav Birndra ) हा ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत सुवर्णपदक पटकावणारा क्रिडापटू आहे. 28 सप्टेंबर 1983 रोजी डेहराडून येथे अभिनव बिंद्राचा जन्म झाला होता. अभिनव 1998 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील सर्वात तरुण नेमबाज होता. 11 ऑगस्ट 2008 रोजी बीजिंग ऑलिम्पिक खेळांच्या वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. अभिनव बिंद्राने वयाच्या १५ व्या वर्षी नेमबाजीला सुरुवात केली होती. 2000 मध्ये, अभिनव सिडनी ऑलिम्पिकमध्ये सर्वात तरुण नेमबाज ठरला होता. अनुभवाच्या बाबतीत ते त्याचे पहिले ऑलिम्पिक यश होते. 2001 म्युनिक चषकात त्याने कांस्यपदक जिंकले. त्याच वर्षी, मँचेस्टरमध्ये देखील 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकण्यात तो यशस्वी झाला होता. 2004 च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये अभिनवने हा विक्रम रचला. मात्र त्याला पदक जिंकता आले नव्हते. 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये बिंद्राने थेट सुवर्णपदकावर धडक मारली. 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत अभिनवने सुवर्णपदक जिंकले. क्रीडा क्षेत्रातील कामगिरी पाहता भारत सरकारने 2009 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते.
नीरज चोप्रा भालाफेकपटू नीरज चोप्राने ( Javelin Thrower Neeraj Chopra ) टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये ८७.५८ मीटर भाला फेकत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. नीरज चोप्राला नुकतेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या राष्ट्रपती भवनात पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नीरज चोप्राचा जन्म 24 डिसेंबर 1997 रोजी हरियाणा राज्यातील खांद्रा या छोट्या गावात झाला आहे. शेती हा कुटुंबाचा व्यवसाय होता. केवळ 11 वर्षांचा असताना नीरज चोप्राला भालाफेकमध्ये रस निर्माण झाला होता. त्यानंतर त्याने पानिपत येते स्टेडियममध्ये सराव सुरू केला होता. 2016 च्या IAAF U20 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने पोलंडच्या बायडगोस्झ्झ उत्तम कामगिरी केली होती. 2021 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. 2016 च्या दक्षिण आशियाई खेळांमध्ये, त्याने 82.23 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले आणि भारतीय राष्ट्रीय विक्रमाची बरोबरी केली. अशी कामगिरी करूनही, 2016 च्या ऑलिंपिकमध्ये तो स्थान मिळवू शकला नाहीत. सध्या तो भारतीय लष्कराच्या राजस्थान रायफल्समध्ये कार्यरत आहे. नीरजने 2017 आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 85.23 मीटर फेकून सुवर्णपदक पटकावले होते. गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या 2018 कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याने 86.47 मीटर फेक करून स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले. जून 2022 मध्ये, नीरज चोप्राने फिनलंडमधील पावो नुर्मी गेम्समध्ये 89.30 मीटर अंतरापर्यंत भालाफेक करून त्याचा स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडला आणि त्याचा ऑलिम्पिक विक्रम मागे टाकला. नीरज चोप्राने येथे 86.69 मीटर विक्रमी भाला फेकत सुवर्णपदक पटकावले होते.जीन, यूएसए येथे झालेल्या जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत नीरज चोप्राने 88.13 मीटर भालाफेक केली आणि 19 वर्षांनंतर भारताला पदक मिळवून दिले.
सुशील कुमारदिल्लीतील नजफगढ भागातील बाप्रोला गावात 26 मे 1983 मध्ये सुशील कुमार यांचा जन्म झाला. सुशील कुमार हा एक भारतीय कुस्तीपटू ( Sushil Kumar Indian wrestler ) आहे. 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने रौप्य पदक पटकावले होते. 2008 बीजिंग ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक जिंकून सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडून बनण्याचा मान त्याने रटकावला होता. 2008 च्या ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांनी 66 किलो फ्रीस्टाइलमध्ये कझाकिस्तानच्या लिओनिड स्पिरिडोनोव्हला पराभूत करून कांस्यपदक जिंकले. तेव्हा 56 वर्षांच्या इतिहासाची त्यांनी पुन्हा एकदा आठवण करून दिली होती. त्याने 2010 आणि 2014 कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदके जिंकली होते. सुशील कुमार यांच्या कारकीर्दीविषयी बोलायचे झाले तर, 2014मध्ये राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्ण,2012मध्ये लंडन ऑलिंपिकमध्ये रौप्य, 2010मध्ये राष्ट्रकुल खेळात सुवर्ण, 2010मध्ये जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्ण, 2009मध्येजर्मन ग्रां प्री सुवर्ण पदक जिंकले. त्याशिवाय 2008मध्ये बीजिंग ऑलिंपिकमध्ये कांस्य, 2008मध्ये आशियाई कुस्ती स्पर्धेत कांस्य, 2007मध्ये कॉमनवेल्थ रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड,2005मध्ये कॉमनवेल्थ रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड, 2003मध्ये कॉमनवेल्थ रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड, 2003मध्ये आशियाई कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक सुशील कुमार यांनी पटकावले आहे.
कपिल देव कपिल देव यांनी 1975 मध्ये पंजाबविरुद्ध हरियाणाकडून देशांतर्गत क्रिकेटमधून आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली ( Kapil Dev Indian former cricketer ) . 16 ऑक्टोबर 1978 रोजी फैसलाबाद येथे पाकिस्तानविरुद्ध त्यांनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्यावेळी त्यांना खेळात उत्तम कामगिरी करता आली नाही. मात्र आपल्या कामगिरीने भारतीय क्रिकेट संघात त्यांनी त्यांचे स्थान पक्के केले होते. श्रीलंकेविरुद्ध 1983 मध्ये त्यांना विश्वचषकात कर्णधारपदाची संधी मिळाली. त्याची अप्रतिम कामगिरी, नेतृत्व क्षमता आणि त्याच्या संघाच्या पाठिंब्याच्या जोरावर भारताने पहिला विश्वचषक जिंकला. आणि रातोरात तो भारतीय इतिहासाचा एक चमकता तारा बनला. मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली 1992 च्या विश्वचषकात त्यांनी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 225 सामने आणि कसोटी क्रिकेटमध्ये 131 सामने खेळले. 1983 च्या विश्वचषकात त्याने झिम्बाब्वेविरुद्ध 175 धावांची अविस्मरणीय खेळी खेळली होती. त्यामुळे भारताने हा सामना जिंकला. कपिल देव यांनी 1994 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. 1999 मध्ये त्यांची भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली. 1979 - 80 कपिल देव यांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1982मध्ये पद्मश्री प्रदान करण्यात आला. 1983मध्ये विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर. 1991मध्ये पद्मभूषण 2002मध्ये विस्डेन इंडियन क्रिकेटर ऑफ द सेंचुरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हेही वाचा -Achievements In Sports क्रीडा क्षेत्रात भारत देशाची प्रतिमा उंचावलेल्या भारतीय महिला