नवी दिल्ली - सरकारने मंगळवारी आपल्या प्रमुख विमा योजनांच्या प्रीमियममध्ये वाढ केली - प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. या योजना आर्थिकदृष्ट्या सक्षम ठेवण्यासाठी हे केले गेले. PMJJBY चा प्रीमियम दर प्रतिदिन रु.1.25 इतका वाढवला आहे. अशाप्रकारे तो वार्षिक 330 रुपयांवरून 436 रुपयांपर्यंत वाढला आहे.
अधिकृत निवेदनात म्हटले आहे, की (PMSBY) साठी वार्षिक प्रीमियम 12 वरून 20 रुपये करण्यात आला आहे. नवीन प्रीमियम दर (1 जून 2022) पासून लागू होणार आहेत. अशा प्रकारे (PMJJBY)चा प्रीमियम 32 टक्के आणि (PMSBY) 67 टक्क्यांनी वाढला आहे. या योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या दाव्यांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत म्हणजेच (३१ मार्च २०२२) पर्यंत PMJJBY आणि PMSBY अंतर्गत सक्रिय ग्राहकांची संख्या अनुक्रमे ६.४ कोटी आणि २२ कोटी होती. PMSBY लाँच झाल्यापासून (31 मार्च 2022) पर्यंत, प्रीमियम म्हणून 1,134 कोटी रुपये जमा झाले आहेत आणि 2,513 कोटी रुपयांचे दावे अदा करण्यात आले आहेत.