गुवाहाटी (आसाम) -आसाममध्ये मोठ्या प्रमाणात पुरपरिस्थिती आहे. यामध्ये आजपर्यंत 150 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. आणि आणखीही हे मृत्यूचे सत्र सुरूच आहे. ( Flood Situation In Assam ) आज भारतीय सैन्यदलाच्या विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार शोधकार्यात आणखी आठ प्रादेशिक लष्कराचे जवान आणि आणखी चार नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, भारतीय लष्कर, आसाम रायफल्स, टेरिटोरियल आर्मी, (SDRF)आणि (NDRF) यांनी आज तुपुल, मणिपूर येथे घटनास्थळी शोध मोहीम सुरू ठेवली आहे.
किती लोक बेघर झाले - या पुरामुळे आसाममधील 26 जिल्ह्यांमध्ये 31.54 लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. बाजली, बारपेटा, विश्वनाथ, कचर, चिरांग, दरंग, धेमाजी, धुबरी, दिब्रुगढ, दिमा हासाओ, गोलपारा, गोलाघाट, हैलाकांडी, होजाई, कामरूप, कामरूप महानगर, करीमगंज, लखीमपूर, माजुली, मोरीगाव, नागाव, नलकुरपुरी, तागापूर, तागापूर आणि उदलगुरी हे बाधित जिल्ह्यांमध्ये आहेत.
सर्वाधिक प्रभावित जिल्हा - कचार हा सलग दुसऱ्या दिवशी सर्वाधिक प्रभावित जिल्हा राहिला, ज्यामध्ये सुमारे 14.31 लाख लोक प्रभावित झाले आहेत. एकट्या सिलचर जिल्ह्यातच 7,25,306 लोकांना पुराचा फटका बसला आहे. ( Flood Situation In Assam ) बुधवारी, दक्षिण आसाम शहरातील अनेक भाग सलग दहाव्या दिवशी पाण्याखाली गेले. बारपेटा येथे 5.49 लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत. तर, नागावमध्ये सुमारे 5.20 लाख लोक त्यांच्या गावात पुराचे पाणी शिरल्याने त्रस्त आहेत.
शहरातील बहुतांश भाग पाण्याखाली - पुरामुळे बाधित लोकांची संख्या 31.54 लाख झाली आहे. जे एका दिवसापूर्वीच्या 24.92 लाखांच्या आकड्यापेक्षा जास्त आहे. ब्रह्मपुत्रा, बेकी, कोपिली, बराक आणि कुशियारा नद्या धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहेत. सिलचर शहरातील बहुतांश भाग पाण्याखाली गेले असून रहिवाशांना अन्न, पिण्याचे पाणी आणि औषधांचा तुटवडा जाणवत आहे. ( Flood crisis in Assam ) उपायुक्त कीर्ती जल्ली यांनी सांगितले की, बेथकुंडी येथील धरण फुटल्याने सिलचरमधील बहुतांश भाग अजूनही पाण्याखाली आहेत. त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. ते म्हणाले की, बाधित लोकांपर्यंत पिण्याचे शुद्ध पाणी आणि अन्न पोहोचविण्यास प्राधान्य दिले जात आहे.