पणजी - शनिवारी म्हणजेच 16 जानेवारीला देशव्यापी लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी गोव्यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेल्या या कोविड प्रतिबंधक लसीचा पहिल्या टप्प्यातील साठा सकाळी 6 वाजून 22 मिनिटांनी गोव्यात पोहचला. आरोग्य विभागाकडे लसीच्या दोन पेट्या सुपूर्द करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्र्याचे ट्वीट
याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्विट केले आहे की, कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या प्रत्येकी 10 डोसची क्षमता असलेल्या 2350 कुपी (व्हाइल्स) गोव्यात पोहचल्या आहेत. संबधित यंत्रणेकडून योग्य पद्धतीने साठवणूक करून पुढील 24 तासात लसीकरण केंद्रांना वितरण केले जाईल.
कोविशिल्ड लसीचा पहिल्या टप्प्यातील साठा पोहोचला गोव्यात - goa cm appeal
शनिवारी म्हणजेच 16 जानेवारीला देशव्यापी लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी गोव्यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेल्या या कोविड प्रतिबंधक लसीचा पहिल्या टप्प्यातील साठा सकाळी 6 वाजून 22 मिनिटांनी गोव्यात पोहचला. आरोग्य विभागाकडे लसीच्या दोन पेट्या सुपूर्द करण्यात आल्या आहेत.
पहिल्या टप्प्यात 800 जणांना लसीकरण
दरम्यान, गोव्यात बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळ, म्हापसा येथील आझिलो जिल्हा रुग्णालय, जिल्हा उपरुग्णालय फोंडा, हॉस्पिसिओ मडगाव, कॉटेज इस्पितळ चिखली-वास्को, मणिपाल इस्पितळ पणजी, हँथवे, अपोलो व्हिक्टर मडगाव आदी ठिकाणी हे लसीकरण होणार आहे. पहिल्या टप्प्यात 800 जणांना हे लसीकरण करण्यात येईल, असे सरकारने यापूर्वी जाहीर केले आहे. यामध्ये फ्रन्टलाईन वॉरियर्स अर्थात इस्पितळ कर्मचारी, कोविड वॉरियर्स यांना ही लस दिली जाईल. एका ठिकाणी 100 जणांना लस टोचली जाईल.
हेही वाचा -लग्न तोडल्याच्या रागातून तरुणी आणि तिच्या आईचे अपहरण; नवरदेवाला अटक