तेलंगणा (वारंगल) - तेलंगणामधील वारंगल जिल्ह्यातील गीसुकोंडा मंडळ धर्मराम येथील सरकारी वस्त्रोद्योग महामंडळाच्या (टेस्को) गोदामाला सोमवारी (दि. 11 एप्रिल)रोजी रात्री भीषण आग लागली. (The fire Tesco warehouse in Telangana) या आगीत गोदामातील एकूण ३० कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. वारंगल आणि हनुमाकोंडा भागातील सहा अग्निशमन गाड्यांनी आग विझवण्याचे काम केले. यामध्ये, मोठ्या प्रमाणात येथील साहित्य जळून खाक झाले आहे.
कशामुळे घटना? -गोदामात वीजपुरवठा नसल्यामुळे शॉर्ट सर्किट होत नाही. गोदामाच्या आजूबाजूला धूळ आणि वाळलेल्या पानांवर विडी किंवा सिगारेट जळल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या थोड्या वेळापूर्वी आल्या असत्या तर अपघाताचा परिणाम कमी झाला नसता, असे गोदाम अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले की, गोदाम मालकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण उन्हाळ्याच्या हंगामात आग लागण्याची शक्यता असते.