रायपूर - छत्तीसगडमध्ये एक पाचवी इयत्तेतील मुलगा दहावीच्या बोर्ड परिक्षेला बसणार आहे. राज्याच्या इतिहासात असे पहिल्यांदाच होणार असून राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने याला परवानगी दिली आहे. दुर्ग जिल्ह्यातील संतराबाडीमध्ये राहणारा लिवजोत सिंग अरोरा हा अकरा वर्षाचा मुलगा दहावीची परीक्षा देणार आहे.
लिवजोत सिंग अरोरा हा पाचवीतील मुलगा दहावीची परीक्षा देणार आहे बुध्यांक चाचणीनंतर मिळाली परवानगी -
परवानगी देण्याअगोदर लिवजोत सिंगचा बुध्यांक (आयक्यु) तपासण्यात आला. माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दुर्ग जिल्हा रुग्णालयामध्ये लिवजोतची चाचणी घेतली. या चाचणीमध्ये लिवजोतचा बुध्यांक १६ वर्षीय मुला इतका असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर त्याला बोर्ड परिक्षेला बसण्याची परवानगी दिली गेली. आपल्या मुलाची बुद्धिमत्ता पाहून लिवजोतचे वडील गुरुविंदर सिंग अरोरा यांनी त्याला पाठिंबा दिला. दुसऱ्या इयत्तेत असताना तो सहावीच्या पुस्तकातील प्रश्न सोडवत असे. हे पाहून त्याच्या पालकांनी त्याला गणिताचे धडे देण्यास सुरुवात केली.
आजोबांसोबत कॅरम खेळताना लिवजोत सिंग अरोरा परदेशातील मुलांच्या घेतो शिकवण्या -
लिवजोत सिंग आरोरा स्वत:तर अभ्यास करतोच. याशिवाय तो आपल्या पेक्षा वयाने लहान-मोठ्या मुलांच्या ऑनलाइन शिकवण्याही घेतो. सध्या तो परदेशातील दोन मुलांची शिकवणी घेत आहे. त्याला फीच्या रुपात 77 हजार रुपये मिळत आहेत.
खेळातही तरबेज -
११ वर्षीय लिवजोत फक्त अभ्यासातच हुशार नाही तर, खेळामध्येही तरबेज आहे. त्याने बुद्धिबळाच्या पटावर आंतरराष्ट्रीय खेळाडूंशी टक्कर घेतलेली आहे. चेस रँकिंगमध्ये त्याने आपले स्थानही तयार केले आहे.
आपल्या कुटुंबासह लिवजोत सिंग अरोरा लिवजोतला भविष्यात शास्त्रज्ञ होण्याची इच्छा आहे. गणित आणि विज्ञानामध्ये त्याला विशेष रस आहे. त्याला दहावीची परीक्षा देण्याची परवानगी मिळाल्याने त्याचे पूर्ण कुटुंब आनंदी आहे. आपल्या मुलांना जर एखाद्या गोष्टीमध्ये रस असेल तर पालकांनी मुलांना पाठिंबा आणि प्रोत्साहन दिले पाहिजे, असे आवाहन त्याच्या आईने केले आहे.
याअगोदर 2013 मध्ये 12 वर्षाच्या एका मुलाला दहावीची परीक्षा देण्याची परवानगी दिली गेली होती. आतापर्यंत तेलंगनामध्ये 9 वर्ष, मणिपुरमध्ये 12 वर्ष आणि बिहारमध्ये 9 वर्षाच्या मुलाने आपल्या वयापेक्षा जास्त इयत्तेच्या परीक्षा दिल्या आहेत.