प्रयागराज (उत्तर प्रदेश) -जिल्ह्यातील करचना भागातील दिहा गावात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जिथे कुटुंबीयांनी आपल्या 18 वर्षीय मुलीचा मृतदेह केवळ तंत्र-मंत्राद्वारे जिवंत करू या अंधश्रद्धेतून 3 दिवस घरात कोंडून ठेवले होते. मात्र, मंगळवारी सायंकाळी ग्रामस्थांना ही बाब समजताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. याची माहिती पोलिसांना दिली. त्यावर पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे.
करचना पोलीस ठाणे हद्दीतील दिहा गावात अभयराज यादव कुटुंबासह राहतात. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, अभयराजची मुलगी 18 वर्षीय दीपिका हिचा 3 दिवसांपूर्वी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. 3 दिवस कुटुंबीयांनी दीपिकाचा अंत्यसंस्कार केला नाही, ही बाब मंगळवारी गावकऱ्यांना समजली. घरातच तंत्र-मंत्राद्वारे आपल्या मुलीला जिवंत करण्याचा प्रयत्न कुटुंबीय करत असल्याची माहिती मिळाली आहे.