नवी दिल्ली -नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा एकदा (21 जुलै)रोजी अंमलबजावणी संचालनालयाच्या तपास पथकाना चौकशीसाठी बोलावले आहे. ( National Herald Case ) याआधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सलग तीन दिवस चौकशी झाली आहे.
सोनिया गांधींना ईडीकडून पुन्हा नोटीस शेल कंपन्यांच्या माध्यमातून या कंपनीत कर्ज घेण्यात आले - नॅशनल हेराल्ड प्रकरणात खासदार राहुल गांधी यांची जवळपास 50 तास चौकशी करण्यात आली आहे. ( ED Has Once Again Sent a Summons to Sonia Gandhi ) असोसिएट जर्नल लिमिटेड (AJL) ताब्यात घेण्यासाठी सोनिया गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यंग इंडियन नावाची कंपनी स्थापन केली आणि शेल कंपन्यांच्या माध्यमातून या कंपनीत कर्ज घेण्यात आले, असा आरोप करण्यात आला आहे.
50 लाख रुपये दिल्याचा आरोप - काँग्रेसने असोसिएट जनरल लिमिटेडला 90 कोटी रुपयांचे कथित कर्ज दिल्याचा आरोप आहे. हे कर्ज काँग्रेसने यंग इंडियनला दिले आणि याच आधारावर असोसिएट जर्नल लिमिटेडचे बहुतांश शेअर्स सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे गेले. 90 कोटींच्या कर्जाच्या बदल्यात यंग इंडियनने काँग्रेसला केवळ 50 लाख रुपये दिल्याचा आरोप आहे. सध्या या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ED)कडून तपास सुरू आहे.
या अगोदर एक पत्र - काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी बुधवारी (ता. २२ जुन)रोजी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) पत्र (letter) लिहून एजन्सीसमोर हजर राहण्यासाठी आणखी काही आठवड्यांचा अवधी मागितला होता. कोरोना व फुफ्फुसाच्या संसर्गातून आपण आत्ताच रुग्णालयातून बाहेर आलो आहोत. ( Sonia Gandhi wrote a letter to ED ) दरम्यान, आपल्याला आणखी काही दिवस आराम करण्याची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्याला काही दिवस चौकशीसाठी हजर राहता येणार नाही. तरी आपण मला काही दिवसांची वेळ द्यावी अशी विनंती त्यांनी केली होती. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीकडून सोनिया गांधी यांना 23 जून रोजी चौकशीसाठी बोलावले होते.
घरी विश्रांती घेण्याचा सल्ला - कोरोना आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सोनिया गांधी यांना घरी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी ईडीला (ED) पत्र लिहून पूर्णपणे बरी होईपर्यंत हजेरी काही आठवडे पुढे ढकलण्याची मागणी केल्याचे ट्विट काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केले होते.
तपास यंत्रणांचा गैरवापर - सोनिया गांधी यांना सोमवारी (ता. २०) दिल्लीतील खाजगी रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. जिथे त्यांना कोरोना व्हायरसशी संबंधित गुंतागुंतींमुळे दाखल करण्यात आले होते. अंमलबजावणी संचालनालयाच्या तपासाला राजकीय सूडबुद्धी म्हणत काँग्रेसने तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षनेत्यांना लक्ष्य केल्याचा आरोप सध्या केला जात आहे.
हेही वाचा -Goa Political Crisis : अखेर गोव्यातील काॅंग्रेस आमदारांचे बंड झाले थंड; सर्व आमदार काॅंग्रेसमध्येच