सुरत (गुजरात) - रशिया-युक्रेन युद्धामुळे गुजरातच्या हिरे उद्योगाशी संबंधित लाखो मजुरांच्या रोजीरोटीवर परिणाम झाला आहे.ही युनिट्स रशियाकडून लहान आकाराचे हिरे आयात करतात, विशेषत: सौराष्ट्र प्रदेशातील ग्रामीण भागात, जिथे हिऱ्यांची प्रक्रिया आणि पॉलिशिंग होते. रशियाकडून लहान आकाराच्या रफ हिऱ्यांचा पुरवठा होत नसल्यामुळे गुजरातमधील व्यापाऱ्यांना आफ्रिकन देश आणि इतर ठिकाणांहून कच्चा माल खरेदी करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या नफ्यावर परिणाम होत आहे. गुजरातमध्ये १५ लाखांहून अधिक लोकांना रोजगार आहे.
जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट कौन्सिलचे प्रादेशिक अध्यक्ष दिनेश नावडिया यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, राज्यातील अनेक डायमंड युनिट्सनी त्यांच्या कामगारांचे कामाचे तास कमी केले आहेत. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होत आहे. मोठ्या आकाराच्या हिऱ्यांवर प्रामुख्याने सुरत शहरातील युनिट्समध्ये प्रक्रिया केली जाते. सुमारे 70 टक्के कापलेले आणि पॉलिश केलेले हिरे भारतातून अमेरिकेत निर्यात केले जातात. पण रशिया-युक्रेन युद्धामुळे त्यांनी रशियन कंपन्यांवर बंदी घातली आहे.