नवी दिल्ली - गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांना आदरांजली देण्यासाठी 'मेरी आवाज ही मेरी पहचान है' ( meri awaz hi meri pahchan hai ) एक भव्य संगीतमय कार्यक्रमाचे कॅनॉट प्लेस के सेंट्रल पार्कमध्ये दिल्ली सरकारने आयोजन ( Delhi government paid homage to Lata Mangeshkar ) केले होते. गीतकार शिल्पाराव यांच्यासह अनेक कलाकारांचे संगीताच्या माध्यमातून लता दीदींना आदरांजली अर्पण केली. अभिनेता अन्नू कपूर ने कार्यक्रमात सुत्रसंचालन केले. या कार्यक्रमात स्कूल ऑफ स्पेशलाइज्ड एक्सीलेंस द्वारका येथील मुलांनीही आपल्या संगीतमय सादरीकरणाच्या माध्यमातून लता मंगेशकर यांना आदरांजली अर्पण केली.
'त्या देशाचा आवाज होत्या'
यावेळी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, लताजींसारखी महान व्यक्तिमत्त्व ही आपल्या देशाची शान आहे, त्या देशाचा आवाज होत्या आणि त्यांच्या आवाजामुळे त्या आपल्या सर्वांच्या हृदयात कायम अमर राहतील. आज या संगीतमय कार्यक्रमाच्या माध्यमातून दिल्ली सरकार लताजींना दिल्लीतील तमाम नागरिकांच्या आणि देशातील तमाम कलाप्रेमींच्या वतीने विनम्र आदरांजली अर्पण करत आहे. ते म्हणाले की, लतादीदी आज आपल्या सर्वांमध्ये नाहीत. पण आम्हांला अभिमान वाटतो की, आम्ही त्या काळचे साक्षीदार आहेत जेव्हा त्या गात असत, आम्ही सर्वांनी त्यांना गाताना पाहिले आणि ऐकले.
दिल्ली पुन्हा संगीत कार्यक्रमाला सुरूवात -