तेलंगणाच्या सभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हैदराबाद : केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आज रविवारी तेलंगणात के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या नेतृत्वाखालील बीआरएस सरकारसाठी उलटी गिनती सुरू झाली आहे. सध्याचे सरकार सत्तेतून बाहेर फेकल्याशिवाय भाजपचा लढा थांबणार नाही असही ते म्हणाले आहेत. येथील शेवेल्ला येथे 'विजय संकल्प सभा' झाली त्या सभेला संबोधित करताना शहा बोलत होते. तेलंगणात भाजपची सत्ता आल्यास मुस्लिमांचे आरक्षण हटवले जाईल. असही ते म्हणाले आहेत.
पुढच्या निवडणुकांनंतरही मोदीच पंतप्रधान : 'गेल्या आठ-नऊ वर्षांपासून राज्यात भ्रष्ट सरकार चालवणाऱ्या तेलंगणातील सत्ताधारी बीआरएसची उलटी गिनती सुरू झाली आहे. 'केसीआर यांना हे माहित असले पाहिजे की पंतप्रधानपदाची जागा रिक्त नाही. पुढच्या निवडणुकांनंतरही मोदीच पंतप्रधान राहतील. असही ते म्हणाले आहेत. मुख्यमंत्री केसीआर पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनतेपासून दूर ठेवू शकत नाहीत असही ते म्हणाले आहेत.
बेरोजगारांचे जीवन अंधारम : केसीआर यांच्यावर जनतेच्या पैशाचा गैरवापर केल्याचा आरोप केला. गाडीचे स्टेअरिंग मजलिसच्या हातात असून, भाजप मजलिसला घाबरत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शाह म्हणाले की, 'टीएसपीएससी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका लीक होत आहेत, केसीआर लीकबद्दल एक शब्दही उच्चारत नाहीत. मुख्यमंत्री तरुणांच्या जीवाशी खेळत आहेत. पेपरफुटीमुळे बेरोजगारांचे जीवन अंधारमय झाले आहे असही ते यावेळी म्हणाले आहेत.
आमचे लोक तुरुंगाला घाबरत नाहीत : पेपरफुटीप्रकरणी चौकशी करण्यात आलेल्या संजय या कैदीला तुरुंगात टाकण्यात आले. संजयला २४ तासांत जामीन मिळाला. शहा म्हणाले की, 'भाजप कार्यकर्त्यांना तुरुंगात जाण्याची भीती वाटत नाही. तुम्हाला सत्तेतून हाकलल्याशिवाय आमचे कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत असही ते म्हणाले. तसेच, 'राज्यात भाजपची सत्ता आल्यास चोरांना तुरुंगात टाकू', असे शहा म्हणाले. मुस्लिम आरक्षण आम्ही संपवू. मी केसीआरला पुन्हा सांगतो. आमचे लोक तुरुंगाला घाबरत नाहीत. हे सरकार कायम राहण्याच्या लायकीचे आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा :Uddhav Thackeray: ठाकरेंचा गौप्यस्फोट! म्हणाले, खडसेंना पुढे करुन भाजपने युती तोडली