हैदराबाद : चुलत भाऊच बहिणीच्या आरोपी ठरला. लहान वयातच आई-वडील गमावलेल्या आणि काकाच्या घरी आश्रय घेतलेल्या मुलीवर चुलत भावाने लैंगिक अत्याचार केले. ही घटना तिला कोणाला सांगावे कळत नव्हते. कोण तिचे सांत्वन करेल हा प्रश्न होता. त्यामुळे मुलीने आपले दु:ख कोणाला न सांगता चार वर्षे अत्याचार सहन केला.सायबराबाद पोलिसांनी शाळेत आयोजित केलेली जनजागृती परिषद मुलीला आधार म्हणून पुढे आली. शाळेतील शिक्षकाने अनेक वर्षांपासून सुरू असलेले लैंगिक अत्याचार निदर्शनास आणून दिल्यावर हा अत्याचार उघडकीस आला. ( Sexual assault of a girl for years )
POCSO Case : नात्याला काळीमा! चुलत भावानेच बहिणीवर केला वर्षानुवर्षे लैंगिक अत्याचार - POCSO Case
लहान वयातच आई-वडील गमावलेल्या मुलीवर चुलत भावानेच चार वर्षे लैंगिक अत्याचार केला. शिक्षणासाठी ती काकाच्या घरी राहत होती. अत्याचार झाल्याचे तिला कोणाला सांगावे कळत नव्हते. त्यामुळे मुलीने आपले दु:ख कोणाला न सांगता चार वर्षे लैंगिक अत्याचार सहन केला. परंतु शाळेत जनजागृती कार्यक्रम झाल्यानंतर ती शिक्षकाकडे घटनेची महिती दिली.शिक्षकाने अनेक वर्षांपासून सुरू असलेले लैंगिक अत्याचार निदर्शनास आणून दिल्यावर हा अत्याचार उघडकीस आला. ( Sexual assault of a girl for years )
चार वर्षांपासून लैंगिक अत्याचार :दुंडीगल पोलीस ठाण्यात घडलेल्या या अमानवी घटनेबाबत सीआय रमना रेड्डी यांनी तक्रार दिली आहे. बिहारमधील एका मुलीच्या (१५) आई-वडिलांचा ती लहान असतानाच मृत्यू झाला होता. तिची मोठी बहीण आजीकडे तिच्या मूळ गावी राहते, तर पिडीत ही काकाच्या घरी राहत आहे. ती स्थानिक शाळेत दहावीत शिकत आहे. काकाच्या दुसरा मुलगा कमलेश हा मुलीचा भाऊ असून तो चार वर्षांपासून घरी कोणी नसताना तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता.
पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल :मुलगी ज्या शाळेत शिकत आहे, त्या शाळेत गेल्या आठवड्यात बालानगर शे टीमच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती परिषद झाली. दुस-या दिवशी तिने शाळेतील शिक्षकाकडे आपले दु:ख मांडले. ही बाब शिक्षिकेने बालानगर टीमला सांगितली. पथकातील सदस्यांनी जिल्हा बाल संरक्षण विभागाला माहिती दिली. त्यांनी घटनास्थळ गाठून पीडितेशी संवाद साधला. याप्रकरणी गुरुवारी रात्री दुंडीगल पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो आणि 376 आयपीसी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. तरुणीला गांधी रुग्णालयात हलवण्यात आले