पटना (बिहार) - बिहारमधील पूल दुर्घटनेप्रकरणी आयएएस अधिकाऱ्याने दिलेले उत्तर ऐकून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. 'जोराचा वारा आल्यानेच बांधकामाधीन असलेल्या या रस्त्यावरील पुलाचा काही भाग कोसळला' अस या अधिकाऱ्याने नितीन गडकरी यांना उत्तर देताना सांगितले आहे. ( Bihar Bridge Collapse On Gadkari ) 29 एप्रिलला बिहारमधील सुलतानगंज येथील काम सुरु असलेल्या एका पुलाचा काही भाग कोसळला. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, “२९ एप्रिलला बिहारमध्ये पूल कोसळला. मी माझ्या सेक्रेटरीला या दुर्घटनेची कारण विचारली. यावर त्याने मला जोराचा वारा सुटला असल्याने पूल कोसळला असे उत्तर दिले. आयएएस अधिकाऱ्याचे हे उत्तर ऐकून नितीन गडकरींना आश्चर्याचा धक्काच बसला. एक आयएएस अधिकारी असे उत्तर कसे काय देऊ शकतो? असे गडकरी यावेळी म्हणाले आहेत.