अमरावती - आंध्र प्रदेशातील अनकापल्ली जिल्ह्यात गुरुवारी 13 फूट उंच किंग कोब्रा आढळून आला. मिळालेल्या माहितीनुसार, अनकापल्ली जिल्ह्यातील मदुगुला मंडलातील घाट रोडजवळील पाम ऑइल प्लांटेशन मळ्यात कामगारांना 13 फूट लांबीचा किंग कोब्रा आढळला त्याला पकडल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
King Cobra: तब्बल 13 फूट लांब किंग कोब्रा पकडला; व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल - 13 फूट उंच किंग कोब्रा पकडला
आंध्र प्रदेशातील अनकापल्ली जिल्ह्यात गुरुवारी 13 फूट उंच किंग कोब्रा आढळून आला. मिळालेल्या माहितीनुसार, अनकापल्ली जिल्ह्यातील मदुगुला मंडलातील घाट रोडजवळील पाम ऑइल प्लांटेशन मळ्यात कामगारांना 13 फूट लांबीचा किंग कोब्रा आढळला.
![King Cobra: तब्बल 13 फूट लांब किंग कोब्रा पकडला; व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल तब्बल 13 फूट लांब किंग कोब्रा पकडला](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15272719-thumbnail-3x2-cobra.jpg)
तब्बल 13 फूट लांब किंग कोब्रा पकडला
तब्बल 13 फूट लांब किंग कोब्रा पकडला
माहिती मिळताच वन्यजीव संरक्षण समितीचे लोक घटनास्थळी पोहोचले. वन्यजीव संरक्षण सदस्य व्यंकटेश आणि इतर काहींनी गिरिनागु (King Cobra) पकडण्यासाठी अनेक तास मेहनत घेतली. व्यंकटेश यांनी सांगितले की, या किंग कोब्राचे वजन सुमारे सहा किलोग्रॅम आहे. नंतर त्याला वंटलमिडीच्या हद्दीतील जंगलात सोडण्यात आले.