समस्तीपूर (बिहार)Thane Lift Accident :ठाण्यात रविवारी संध्याकाळी मोठी दुर्घटना घडली. येथे एका ४० मजली इमारतीची लिफ्ट कोसळून ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृतांपैकी चार जण बिहारमधील मजूर होते.
प्रशासनाकडून कोणताच आधार मिळत नसल्याचा आरोप : आता या घटनेनंतर मृतांच्या कुटुंबियांनी ठाणे प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. आम्हाला प्रशासनाकडून कोणताच आधार मिळत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. हे सर्व मजूर ४ सप्टेंबर रोजी बिहारमधून महाराष्ट्रात आले होते. त्यांना या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी काम मिळालं. दरम्यान, बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील लिफ्टची तार तुटल्यानं त्याखाली चिरडून या चौघांचाही मृत्यू झाला. रविवारी रात्री बांधकाम कंपनीकडून कुटुंबियांना ही माहिती मिळाली. मात्र अद्याप कोणताही प्रशासकीय कर्मचारी पीडित कुटुंबाला भेटण्यास गेलेला नाही.
या महिन्यात सर्व लोक मुंबईत कामावर गेले होते. रविवारी रात्री आम्हाला कन्स्ट्रक्शन कंपनीकडून फोन आला की, बांधकामाधीन इमारतीची लिफ्ट पडून चार मजुरांचा मृत्यू झाला आहे. गावातील काही लोक मृतदेह आणण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले. मात्र प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही. त्यांचे मृतदेह आणण्यासाठी कोणीही पावले उचलत नाही. घटनेनंतर आम्हाला भेटण्यासाठी कोणताही स्थानिक अधिकारी अद्याप गावात आलेला नाही. - पीडित कुटुंब