श्रीनगर- जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पोलीस कॉन्स्टेबलची पत्नी व मुलगी जखमी झाली आहे.
वेरीनागमध्ये दहशतवाद्यांनी पोलीस कॉन्स्टेबल सज्जाद अहमद मलिक यांची पत्नी व मुलीवर गोळीबार केल्याची अधिकाऱ्यांनी माहिती दिली. पोलिसांच्या माहितीनुसार कोकारगुंड येथे पोलीस कॉन्स्टेबल सज्जाद मलिक यांच्या घरात दहशतवादी घुसले. त्यांनी मलिक यांची पत्नी नाहिदा जान आणि मुलगी मदीहा यांच्यावर गोळ्या झाडल्या. दोघींनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा-First bird flu death धक्कादायक! बर्ड फ्ल्यूने १२ वर्षाच्या मुलाचा दिल्लीत मृत्यू