महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Terrorist Shahnawaz Arrested : पुणे बॉम्बस्फोट प्रकरणातील वॉन्टेड दहशतवाद्याला दिल्लीतून अटक - आयएसआयएस

Terrorist Shahnawaz Arrested : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं पुणे बॉम्बस्फोट प्रकरणात फरार असलेला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी शाहनवाजला सोमवारी सकाळी अटक केली. त्याच्यावर एनआयएनं तीन लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं.

Terrorist Shahnawaz Arrested
Terrorist Shahnawaz Arrested

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 2, 2023, 11:48 AM IST

नवी दिल्ली Terrorist Shahnawaz Arrested : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) चा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी शाहनवाज उर्फ ​​शफी उज्जामाला अटक केली आहे. एनआयएनं शाहनवाजवर तीन लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. शाहनवाज हा दिल्लीचा रहिवासी असून तो व्यवसायानं इंजिनिअर आहे. पुणे पोलिसांच्या ताब्यातून पळून तो दिल्लीत आला होता. तो एका मोठ्या दहशतवादी घटनेची योजना आखत होता. आता विशेष कक्ष त्याची चौकशी करत आहे. एनआयए बऱ्याच दिवसांपासून त्याचा शोध घेत होती.

३-४ संशयितांना ताब्यात घेतलं : मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पोलिसांना आयएसआयएस (ISIS) चे तीन दहशतवादी दिल्लीत लपल्याची खबर मिळाली होती. या माहितीवरून शोध घेतला जात होता. या कारवाईअंतर्गत पोलिसांनी सोमवारी पहाटे शाहनवाजला अटक केली. त्याची चौकशी केल्यानंतर स्पेशल सेलनं आणखी ३-४ संशयितांना ताब्यात घेतलं. यातील एक संशयित दिल्लीबाहेरून पकडला गेला आहे. आतापर्यंत तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

आयएसआयएस दहशतवादी संघटना :आयएसआयएस अर्थातच 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सीरिया' ही पश्चिम आशियातील एक दहशतवादी संघटना आहे. ही संघटना २०१३ मध्ये अस्तित्वात आली होती. ही जगातील सर्वात भयानक तसेच श्रीमंत दहशतवादी संघटना मानली जाते. तिचं बजेट तब्बल दोन अब्ज डॉलर्स असल्याचं सांगितलं जातं. २०१४ मध्ये या संघटनेनं त्यांचा नेता अबू बकर अल-बगदादीला जगातील सर्व मुस्लिमांचा खलीफा म्हणून घोषित केलं होतं. इराक आणि सीरियाचा मोठा भाग या दहशतवादी संघटनेच्या ताब्यात असल्याचं मानलं जातं. जुन्या इस्लामी कायद्यांवर ही दहशतवादी संघटना काम करते.

हेही वाचा :

  1. NIA Raid on Khalistani Gangster : खलिस्तानवादी समर्थकांविरोधात कारवाईला गती; 'एनआयए'ची सहा राज्यात छापेमारी
  2. Khalistani Shelter in Nanded : 'एनआयए'कडून गँगस्टर्सची यादी जाहीर; नांदेडात आश्रय घेण्याची शक्यता, पोलीस सतर्क
  3. Ghazwa E Hind : एनआयएच्या रडारवर 'गजवा ए हिंद'चे स्लीपर सेल, नेमकी ही दहशतवादी संघटना कशी निर्माण झाली?

ABOUT THE AUTHOR

...view details