महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Terrorist Roots in heroin case: गुजरातच्या मुंद्रा बंदरावर पकडलेल्या हेरॉईनचे दहशतवादी 'कनेक्शन', लष्कर ए तोयबाशी संबंध - लष्कर ए तोयबाद्वारे संचालन

गुजरातच्या मुंद्रा बंदरात दोन वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केल्याप्रकरणी एनआयएने मोठा खुलासा केला आहे. या अंमली पदार्थांच्या तस्करीचा संबंध लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.

Terrorist Roots in heroin case, import address is Vijayawada...operated by Lashkar E Taiba?
गुजरातच्या मुंद्रा बंदरावर पकडलेल्या हेरॉईनचे दहशतवादी 'कनेक्शन'.. लष्कर ए तोयबाशी संबंध..

By

Published : Feb 21, 2023, 4:45 PM IST

अमरावती (आंध्रप्रदेश): गुजरातच्या मुंद्रा बंदरात जप्त करण्यात आलेल्या हेरॉईन प्रकरणाचा थेट दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) म्हटले आहे. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील सत्यनारायणपुरम येथे नोंदणीकृत आशी ट्रेडिंग कंपनीच्या नावाने अमली पदार्थ देशात आयात केले जात होते. तपासादरम्यान असे आढळून आले की, या ड्रग्जच्या विक्रीतून मिळणारे पैसे लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेला दान केले जात होते. सोमवारी एनआयएने पुरवणी आरोपपत्र दाखल करून कंपनी हा निधी देशात दहशतवादी कारवाया चालवण्यासाठी वापरत असल्याचा आरोप केला.

विजयवाडा येथे करण्यात आली चौकशी: सप्टेंबर 2021 मध्ये, महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) च्या अधिकार्‍यांनी 3,000 किलो हेरॉईन जप्त केले. अफगाणिस्तानातून ते टॅल्कमच्या नावाखाली इराणच्या बंदर अब्बास बंदरमार्गे गुजरातमधील मुंद्रा बंदरात आणले होते. विजयवाडा येथील सत्यनारायणपुरम क्लॉक स्ट्रीट येथे नोंदणीकृत आशी ट्रेडिंग कंपनीच्या नावाने हेरॉईन आयात केले जात असल्याचे डीआरआयला आढळून आले. कोनसीमा जिल्ह्यातील द्वारपुडी येथील मचावरम सुधाकर यांनी पत्नी दुर्गा पौर्णिमेच्या नावाने आशी ट्रेडिंग कंपनीची नोंदणी केली होती.

अनेक कागदपत्रे केली जप्त:त्यानंतर एनआयएने घर ताब्यात घेतले. विजयवाडा येथे झडती घेण्यात आली आणि अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली. सत्यनारायणपुरम येथील पत्त्यावर एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट कोड परवाना घेतल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर सुधाकर आणि वैशाली यांना अटक करण्यात आली. या कंपनीचा वापर हेरॉईन आयात करण्यासाठी करण्यात आला होता. त्यांचा सहभाग पहिल्या आरोपपत्रातच नमूद करण्यात आला आहे. दाखल करण्यात आलेल्या नव्या आरोपपत्रात हेरॉइनच्या आयातीमागे लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

हरप्रीत सिंग हा मास्टरमाईंड : दिल्लीचा हरप्रीत सिंग तलवार उर्फ ​​कबीर तलवार हा मास्टरमाईंड असल्याचे एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे. दिल्लीत क्लब, रिटेल शोरूम आणि इंपोर्ट फर्म चालवण्याच्या नादात तो आपले कर्मचारी, कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्या मित्रांच्या नावाने ड्रग्ज आयात करत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. या क्रमात आशी ट्रेडिंग कंपनी आणि मचावरम सुधाकर यांचाही वापर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. हा सर्व निधी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेला दिला जात असल्याचे यात सांगण्यात आले आहे. एनआयएने हा मोठा खुलासा केला आहे.

हेही वाचा: Nagaland Assembly Election 2023 : नागालँड शांती वार्ता सुरु, मोदींच्या नेतृत्वात आम्हाला यश मिळेल - अमित शाह

ABOUT THE AUTHOR

...view details