कुपवाडा :जम्मू-काश्मीर पोलिसांनी एका कारवाईमध्ये दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. या व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. बुधवारी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार कुपवाडा पोलीस, २८ आरआर आणि १६२ केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) या दलांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. यामध्ये अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव अब राशद लोन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या तरुणाकडून तीन ग्रेनेड, आणि एके-४७ बंदुकीची ५८ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.