महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

टेरर फंडिंग प्रकरण : काश्मीरमध्ये एनआयएचा छापा, सहा जणांना अटक - NIA

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एनआयए) आज सकाळपासूनच जम्मू-काश्मीरमधील अनेक ठिकाणी छापे टाकत आहे. एनआयएने अनंतनागमधून पाच आणि श्रीनगरमधील एका व्यक्तीला अटक केली आहे. एनआयएचे छापेमारी अद्याप सुरू आहे.

टेरर फंडिंग प्रकरण
टेरर फंडिंग प्रकरण

By

Published : Jul 11, 2021, 12:52 PM IST

श्रीनगर -दहशतवादी निधी प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एनआयए) आज सकाळपासूनच जम्मू-काश्मीरमधील अनेक ठिकाणी छापे टाकत आहे. एनआयएने अनंतनागमधून पाच आणि श्रीनगरमधील एका व्यक्तीला अटक केली आहे. एनआयएचे छापेमारी अद्याप सुरू आहे.

एनआयएच्या पथकासह सुरक्षा दलाचे जवान उपस्थित आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे सर्व दहशतवादी निधी प्रकरणाशी संबंधित आहेत. काश्मीर खोऱयातील अनंतनाग व्यतिरिक्त एनआयए श्रीनगर, अवंतीपोरा आणि बारामुल्ला येथेही छापे टाकत आहे. दहशतवादी संघटना इसिसच्या मॉड्यूलशी संबंधित दहा वर्ष जुन्या एका घटनेच्या संदर्भात हे छापा टाकण्यात येत आहे.

11 सरकारी कर्मचार्‍यांना कामावरून काढले -

जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी 11 सरकारी कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. यामध्ये दहशतवादी सलाहुद्दीनच्या दोन मुलांचा समावेश आहे. प्रत्येकावर भारतविरोधी कारवाया केल्याचा आरोप आहे. घटनेच्या कलम 311 (2) (क) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. बर्खास्त झालेल्या 11 कर्मचार्‍यांपैकी 4 कर्मचारी अनंतनागचे, 3 बडगामचे, बारामुल्ला, श्रीनगर, पुलवामा आणि कुपवाडा येथील प्रत्येकी एक आहेत. यापैकी 4 जण शिक्षण विभागात, 2 जण जम्मू-काश्मीर पोलीस विभागात आणि प्रत्येकी एक जण कृषी, कौशल्य विकास, ऊर्जा, एसकेआयएमएस आणि आरोग्य विभागात कार्यरत होते.

दहशतवाद्यांचा नायनाट -

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा नायनाट करण्याची मोहिम सुरुच आहे. शनिवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये अनंतनाग जिल्ह्यात चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. तसेच गेल्या 9 जुलैला जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी येथील भारत-पाकिस्तानच्या सीमेवरील दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रयत्न सैन्यदलाने उधळून लावले होते. त्यावेळी दोन पाकिस्तानी दहशतवादी ठार झाले. तर दोन जवानांना वीरमरण आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details