महाराष्ट्र

maharashtra

पंजाब: कारची डिझेल टँकरला जोरदार धडक; आगीत पाच प्रवाशांचा जिवंत जळून मृत्यू

By

Published : Nov 17, 2020, 12:13 PM IST

कारमधील प्रवासी हे विवाह सोहळ्याचा स्वागत समारंभ आटोपून सोमवारी रात्री मोगाच्या दिशेने येत होते. या कारचा संग्रुर-सुनाम या मार्गावर अपघात झाला.

कारने घेतलेला पेट
कारने घेतलेला पेट

चंदीगढ (पंजाब) - पेटलेल्या कारमध्ये जळून पाच जणांचा जळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.संग्रुर-सुनाम या मार्गावर कारने ट्रकला धडक दिल्यानंतर अपघात झाला. या अपघातानंतर कारने पेट घेतला होता.

कारमधील प्रवासी हे विवाह सोहळ्याचा स्वागत समारंभ आटोपून सोमवारी रात्री मोगाच्या दिशेने येत होते. या कारचा संग्रुर-सुनाम या मार्गावर अपघात झाला. अपघातामध्ये डॉक्टरचा समावेश असल्याचे संग्रुरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक विवेक शील सोनी यांनी सांगितले. हा अपघात मध्यरात्री झाला.

डिझेल सांडल्याने कारने घेतला पेट-

कारने डिझेल टँकरला धडक दिली. धडकेनंतर डिझेल सांडल्याने कारने पेट घेतला. या आगीत कारमधील प्रवाशांना जीव वाचविण्याची संधीही मिळाली नाही. पाचही प्रवाशांचा जिवंतपणे जळून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह कारमधून काढण्यासाठी कारचा पत्रा कापावा लागल्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सोनी यांनी सांगितले.

अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून ट्रकचालक फरार झाला. मात्र, त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असा पोलिसांनी विश्वास व्यक्त केला. काही दिवसांपूर्वीच वरिष्ठ वकील आणि त्याचे सहकारी जिवंतपणे अपघातात जळाले होते. हा अपघात होशियारपूर जिल्ह्यात घडला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details