महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अमेरिकन दूतावासात बनावट कागदपत्र सादर करणाऱ्या युवकास अटक

अमेरिकन दूतावासात ( US Embassy ) बनावट कागदपत्रे ( Fake Documents ) सादर केल्याप्रकरणी तेलंगणातील विकाराबाद येथील तरुणाला चेन्नई पोलिसांनी अटक केली आहे. कर्णम साई दिलीप, असे अटक असलेल्या तरुणाचे नाव आहे.

आरोपी
आरोपी

By

Published : May 22, 2022, 5:18 PM IST

चेन्नई ( तमिळनाडू )- अमेरिकन दूतावासात ( US Embassy ) बनावट कागदपत्रे ( Fake Documents ) सादर केल्याप्रकरणी तेलंगणातील विकाराबाद येथील तरुणाला चेन्नई पोलिसांनी अटक केली आहे. कर्णम साई दिलीप, असे अटक असलेल्या तरुणाचे नाव आहे. तरुणाने अमेरिकेत शिकण्यासाठी विद्यार्थी व्हिसासाठी ( Student Visa ) अर्ज केला होता. विद्यार्थी व्हिसासाठी अर्ज करताना त्या तरुणाने काही बनावट दस्तऐवज सादर केले होते. दूतावासातील अधिकाऱ्यांना याबाबत शंका आल्याने त्यांनी चेन्नई येथील आयुक्तालयात तक्रार दिली होती.

कर्णम हा शुक्रवारी (दि. 20 मे) व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी व मुलाखतीसाठी अमेरिकन दूतावासात आला होता. त्यावेळी त्याने सादर केलेल्या कागदपत्राबाबत शंका उपस्थित झाल्याने दूतावासातील अधिकाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर चेन्नई पोलिसांनी त्याला कागदपत्रासह ताब्यात घेतले होते. पोलिसांच्या तपासाती ती कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी कर्णम याला न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा -पियाली बसाक ठरली ऑक्सिजनशिवाय एव्हरेस्ट सर करणारी भारताची पहिली महिला गिर्यारोहक

ABOUT THE AUTHOR

...view details