हैदराबाद - तेलंगाणा उच्च न्यायालयाने 1 सप्टेंबरपासून शैक्षणिक संस्था उघडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. तेलंगाणा सरकारने 1 सप्टेंबरपासून अंगणवाडी केंद्रासहित राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था उघडण्याची घोषणा केली होती.
कोरोना महामारीची स्थिती लक्षात घेता तेलंगाणा उच्च न्यायालयाने तेलंगाणा सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. रिपोर्टनुसार तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी 1 सप्टेंबरपासून राज्यातील शाळा, कॉलेज आणि सर्व शैक्षणिक संस्था उघडण्याचे आदेश दिले होते. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. कोरोना-19 महामारीनुसार 30 ऑगस्टपर्यंत सर्व शैक्षणिक संस्था आणि वसतीगृहांना स्वच्छता आणि साफसफाई करण्याचे तेलंगाणा सरकारने निर्देश दिले होते.
हेही वाचा-राजस्थान - बिकानेरमधील श्री बालाजी गावाजवळ अपघात, 11 जण ठार
दिल्ली सरकारकडून नववी ते बारावी इयत्तेपर्यंतचे वर्ग पुन्हा सुरू करण्याची तयारी