पुद्दुचेरी - येत्या काही महिन्यात पुद्दुचेरीच्या विधानसभा निवडणूका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांची नायब राज्यपाल पदावरुन अचानक उचलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर आज तामिळसाई सौंदराराजन यांनी गुरुवारी पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल म्हणून औपचारिकपणे कार्यभार स्वीकारला. मद्रास हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी यांनी आज राज निवासात तमिळसाई यांना पदाची शपथ दिली. पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी कार्यक्रमास उपस्थित होते.
तामिळसाई केंद्रशासित प्रदेशातील 26 व्य नायब राज्यपाल आणि पाचव्या महिला नायब राज्यपाल आहेत. पुदुचेरीच्या इतिहासात प्रथमच, तामिळ भाषिक व्यक्तीला नायब राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
पुद्दुचेरीत काँग्रेसचे सरकार अल्पमतात -