महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 24, 2022, 12:22 PM IST

Updated : Mar 24, 2022, 4:15 PM IST

ETV Bharat / bharat

KCR IN Kolhapur : 'आई अंबाबाईकडे प्रार्थना केली की देश पुढे चांगल्याप्रकारे चालावा' - केसीआर

Kolhapur: Telangana Chief Minister K Chandrasekhar Rao is on a visit to Kolhapur today. Chandrasekhar Rao has arrived in Kolhapur to pay obeisance to Shri Ambabai. He flew from Hyderabad to Kolhapur Airport a short while ago. He will soon pay obeisance to the Goddess at Shri Ambabai Temple, a resident of Karveer.

KCR IN Kolhapur
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची प्रतिक्रिया

12:02 March 24

केसीआर यांनी केली अंबाबाईकडे प्रार्थना

कोल्हापूर -तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. ते श्री अंबाबाई दर्शनासाठी कोल्हापुरात दाखल झाले असून काही के. चंद्रशेखरराव यांनी करवीर निवासीनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी अंबाबाईकडे प्रार्थना केली आहे, 'आम्ही देवाला मानणारे लोक आहेत. माझी खूप दिवसांची इच्छा होती. आईचे बोलावणे आता आले, आज आई अंबाबाईचे दर्शन मिळाले. खूप खूप प्रसन्न वाटत आहे. आईकडे ऐवढीच प्रार्थना केली आहे, की देश समोर चांगल्याप्रकारे चालावा, देशवासियांचे कल्याण व्हावे.'

केसीआर हे विमानाने कोल्हापुरात पोहोचले होते. त्यांनी थोड्याच वेळात करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात दर्शन देवीचे दर्शन प्रस्थान केले. गेल्या महिन्यातच ते महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची सुद्धा भेट घेतली होती. आज ते अंबाबाईच्या दर्शनाला आले होते. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र त्यांनी यावेळी कोणतीही राजकीय प्रतिक्रिया दिली नाही.

केसीआर म्हणाले -'आम्ही देवाला मानणारे लोक आहेत. माझी खूप दिवसांची इच्छा होती. आईचे बोलावणे आता आले, आज आई अंबाबाईचे दर्शन मिळाले. खूप खूप प्रसन्न वाटत आहे. आईकडे ऐवढीच प्रार्थना केली आहे, की देश समोर चांगल्याप्रकारे चालावा, देशवासियांचे कल्याण व्हावे.'

केसीआर यांनी केले नाही कोणतेच राजकीय वक्तव्य -केसीआर यांनी नुकतेच महाराष्ट्र दौरा गेला होता. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची सुद्धा भेट घेतली होती. यावेळी त्यांनी देशात सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेबद्दल तसेच महाराष्ट्र तेलंगणा पाणी प्रश्नाबाबत चर्चा केली होती. करवीर निवासणी अंबाबाईच्या दर्शनासाठी ते आज (गुरुवारी) कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. ते सगल महाराष्ट्राच्या दुसऱ्यांदा दाखल झाल्याने त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण नागरिकांचे लक्ष लागून होते. ते करवीर निवासी चरणी कोणती प्रार्थना करतील याकडे सर्व स्तरातून लक्ष लागून होते. मात्र त्यांनी करवीर निवासी अंबाबाई मंदिर परिसरात प्रतिक्रिया देतांना कोणतेही राजकीय वक्तव्य केले नाही. तर ते म्हणाले की, माझी खूप दिवसांची इच्छा होती. आईचे बोलावणे आता आले, आज आई अंबाबाईचे दर्शन मिळाले. खूप खूप प्रसन्न वाटत आहे.

Last Updated : Mar 24, 2022, 4:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details