हैदराबाद : तेलंगणा भाजपचे प्रमुख बंदी संजय यांना न्यायालयातून जामीन मिळाल्याने भाजपच्या पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. संजय यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली.हिंदी एसएससी पेपर लीक प्रकरणी त्यांना अटक करण्यात आल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. संजय यांच्या अटकेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी तेलंगणा सरकारचा निषेध केला.
SSC question paper leak case : पेपर फुटी प्रकरणात तेलंगणाचे भाजप अध्यक्ष संजय बंदी यांची तुरुंगातून सुटका
तेलंगणात भाजप विरोधात टीआरएसमध्ये कमालीचा वाद पेटला आहे. तेलंगणा सरकारच्या तक्रारीनंतर पेपर फुटी प्रकरणात भाजपचे प्रमुख बंदी संजय यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. त्यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. हिंदी एसएससी पेपर लीक प्रकरणात त्यांना जामीन मिळाला आहे. आज त्याची तुरुंगातून सुटका झाली असून ते घरी पोहोचले आहेत.
संजय कुमार यांच्याविरोधात हे आहेत गुन्हे दाखल-पोलिसांनी भाजप नेते संजय कुमार यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 420, 4(A), 6 T.S ची नोंद केली होती. वारंगल जिल्ह्यातील कमलापूर पोलीस स्टेशनमध्ये सार्वजनिक परीक्षा (अनाचार प्रतिबंध) आणि 66-D ITA-2000-2008 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही अटक म्हणजे लोकशाहीविरोधी असून कट असल्याचा दावा संजय बंदी यांच्या कार्यालयाने केला होता.
हेही वाचा-Bandi Sanjay Arrested: तेलंगणात भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना अटक, भाजप- बीआरएस संघर्ष तीव्र होणार