महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Telangana Assembly Election : तेलंगाणा विधानसभा निवडणूक, मुख्यमंत्री राव यांनी बीआरएसच्या सर्व 119 उमेदवारांची केली घोषणा - तेलंगाणा विधानसभा निवडणूक

तेलंगाणामध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी भारत राष्ट्र समितीचे (BRS) अध्यक्ष के. चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर यांनी राज्यातील सर्व 119 जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली.

KCR
केसीआर

By

Published : Aug 21, 2023, 4:23 PM IST

हैदराबाद :तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (BRS) अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी आगामी तेलंगाणा विधानसभा निवडणुकीसाठी सर्व 119 जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली. मुख्यमंत्री केसीआर गजवेल आणि कामारेड्डी या दोन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. निवडणूक आयोगाने अद्याप तेलंगाणा निवडणुकीच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत.

उमेदवारांची यादी

अनेक आमदारांना पुन्हा तिकीट : तेलंगाणामध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी विद्यमान आमदारांपैकी अनेक आमदारांना पुन्हा तिकीट दिले आहे. त्यांनी बीआरएस उमेदवारांची संपूर्ण यादी किरकोळ बदलांसह जाहीर केली. तसेच तिकीट नाकारलेल्यांना विविध पदांवर सामावून घेण्यात आले आहे. केसीआर यांचा मुलगा केटीआर यांना सिरिल्ला येथून तिकीट मिळाले आहे. ते येथून विद्यमान आमदार आहेत.

उमेदवारांची यादी

95-105 जागा जिंकण्याचा विश्वास : उमेदवारांची घोषणा करताना केसीआर म्हणाले की, 'आजचा दिवस चांगला आहे. त्यामुळे आम्ही उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय घेतला. आम्ही पक्षाला नक्कीच पुढे नेऊ. बीआरएस पक्ष भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांपेक्षा वेगळा आहे', असे ते म्हणाले. तसेच, 'आगामी निवडणुकीत आम्ही 95-105 जागा नक्कीच जिंकू', असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 'आम्ही वरंगलमध्ये 16 ऑक्टोबर रोजी आमच्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करू. पक्षविरोधी कारवायांमध्ये जो कोणी सहभागी असेल त्याला पक्षातून हाकलून दिले जाईल', असा दमही केसीआर यांनी यावेळी दिलाय.

उमेदवारांची यादी

केसीआर कोणत्याही आघाडीत सामिल नाहीत : तेलंगणात 2018 मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत केसीआर यांच्या टीआरएसने 88 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसने १९, एआयएमआयएम ७, टीडीपी २ आणि भाजपाने १ जागा जिंकली होती. उल्लेखनीय म्हणजे, के चंद्रशेखर राव सध्या सत्ताधाऱ्यांची 'एनडीए' किंवा विरोधकांची 'इंडिया' या दोन्ही आघाडींमध्ये सामिल नाहीl. मात्र गेल्या काही काळापासून ते कॉंग्रेसवर टीका करत असून भाजपाच्या अधिक जवळ आले आहेत.

उमेदवारांची यादी

हेही वाचा :

  1. KCR on Sharad Pawar : 'आम्हाला भाजपची 'बी' टीम म्हणता, आता तुमचाच पक्ष...', केसीआर यांचा शरद पवारांवर हल्लाबोल
  2. Sharad Pawar on KCR: केसीआर यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात ताफ्याने शक्तीप्रदर्शन...शरद पवारांनी लगावला टोला
  3. Bhagirath Bhalke Join BRS : केसीआर यांच्या उपस्थितीत भगीरथ भालके यांचा बीआरएसमध्ये जाहीर प्रवेश

ABOUT THE AUTHOR

...view details