महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

तेलंगणात सुरुवातीच्या मतमोजणीत कॉंग्रेस आघाडीवर, काँग्रेसचे निरीक्षक माणिकराव ठाकरे यांनी कुणाला दिलं श्रेय?

Telangana Assembly Election Result : तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालीय. सुरुवातीच्या कलांमध्ये कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. यावरुन कॉंग्रेसनं मोठा दावा केलाय.

Telangana Assembly Election Result
Telangana Assembly Election Result

By ANI

Published : Dec 3, 2023, 9:45 AM IST

हैदराबाद Telangana Assembly Election Result :तेलंगणा विधानसभा निवडणूकीची मतमोजणी सकाळपासून सुरू झालीय. सुरुवातीच्या फेरीमधील मतमोजणीत कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. यावरुन तेलंगणाचे अखिल भारतीय काँग्रेसचे निरीक्षक माणिकराव ठाकरेंनी मोठा दावा केलाय.

काय म्हणाले माणिकराव ठाकरे : तेलंगणाचे अखिल भारतीय काँग्रेसचे निरीक्षक माणिकराव ठाकरे म्हणाले, 'दक्षिणात्य राज्यात काँग्रेस 70 हून अधिक जागा जिंकेल. एक्झिट पोलनंही तेच सांगितलंय. तेलंगणात पक्षाच्या बाजूनं झालेल्या बदलाचं श्रेय त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला दिलंय. पुढं माणिकराव म्हणाले की, आमच्या पक्षप्रमुख सोनिया गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आमची धोरणं लोकांना समजावून सांगितली आहेत. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा चांगलाच परिणाम झालाय. केसीआर तेलंगणात राजा-महाराजासारखे वागले. काँग्रेसनं तेलंगणाला राज्याचा दर्जा दिला होता. सर्वांना तेच हवं होतं. हे एक चांगलं राज्य होईल, असं वाटलं होत मात्र तसं झालं नाही, असंही माणिकराव ठाकरे म्हणाले.

199 जागांसाठी मतमोजणी सुरु : तेलंगणातील 199 विधानसभा जागांसाठी आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या प्रक्रियेत राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांसह 109 पक्षांच्या 2,290 उमेदवारांचे भवितव्य स्पष्ट होणार आहे. साधारण दुपारपर्यंत निकालाचं स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार महत्त्वाच्या राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल 2024 च्या लोकसभा निवडणुकीत दिसणारे संभाव्य राजकीय बदल दाखविणार आहेत. निवडणूक आयोगाच्या (ईसी) मतं, तेलंगणा 30 नोव्हेंबरच्या विधानसभा निवडणुकीत 70.28 टक्के मतदान झालंय. राज्यभरात उभारण्यात आलेल्या 35,655 मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तेलंगणात बहुमताचा आकडा 60 आहे. 2018 मध्ये BRS (तत्कालीन तेलंगणा राष्ट्र समिती) नं 119 पैकी 88 जागा जिंकल्या होत्या. तर बीआरएसला 47.4 टक्के मतं मिळाली होती. तर काँग्रेस 19 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर होती.

हेही वाचा :

  1. जाणून घ्या चार राज्यांच्या निवडणुकांचा निकाल एका क्लिकवर
  2. Election Results 2023 Live Updates: राजस्थानमध्ये काँग्रेसचा एक उमेदवार आघाडीवर, के कविता कार्यालयाकडं रवाना
  3. लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल; चार राज्यांमध्ये कोणाचं सरकार येणार? जाणून घ्या, A टू Z

ABOUT THE AUTHOR

...view details