महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

तेलंगाणा विधानसभा निकाल 2023 : होम ग्राऊंडवर BRS ला मोठा धक्का; केसीआर यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

Telangana Election Results 2023 : तेलंगाना विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी रेवंथ रेड्डी यांच्या घराबाहेर प्रचंड जल्लोष सुरू केला आहे. कार्यकर्ते फटाके फोडून आपला आनंद साजरा करत आहेत.

Telangana Election Results 2023
कार्यकर्त्यांनी फटाके फोडून सुरू केला जल्लोष

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 3, 2023, 11:20 AM IST

Updated : Dec 3, 2023, 5:16 PM IST

हैदराबाद Telangana Election Results 2023 :तेलंगाना विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. थोड्याच वेळात निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या काँग्रेस पक्ष तेलंगाणात आघाडीवर असल्याचा कल आहे. काँग्रेस पक्ष 66 जागांवर तर भारत राष्ट्र समिती 41 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. कार्यकर्ते फटाके फोडून आपला आनंद साजरा करत आहेत.

  • काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष : तेलंगाना विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते तेलंगाना काँग्रेसचे प्रमुख रेवंथ रेड्डी यांच्या घरासमोर मोठा जल्लोष करत आहेत. कार्यकर्त्यांनी रेवंथ रेड्डी यांच्या हैदराबाद इथल्या घराबाहेर जमत मोठा जल्लोष सुरू केला आहे. काँग्रेसनं विधानसभी निवडणूक 2023 मध्ये भारत राष्ट्र समितीला मात देत 66 जागांवर वर्चस्व मिळवलं आहे.
  • भारत राष्ट्र समिती पिछाडीवर : तेलंगाना विधानसभा निवडणुकीत भारत राष्ट्र समितीला मोठा फटका बसल्याचं स्पष्ट होत आहे. सध्या हाती आलेल्या आकडेवारींमध्ये सध्या काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे. भारत राष्ट्र समिती केवळ 41 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेसनं तब्बल 66 जागांवर मुसंडी मारली आहे. त्यामुळे मतदारांनी भारत राष्ट्र समितीकडं पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे.
  • भाजपा केवळ 8 जागांवर आघाडीवर : तेलंगानांमध्ये भाजपा मोठ्या मताधिक्क्यानं विजय संपादन करेल असं भाकित वर्तवण्यात येत होतं. मात्र तेलंगाना विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजापाला केवळ 9 जागांवरच आघाडी घेता आली आहे. त्यामुळे भाजपा नेत्यांचं तेलंगाना सत्ता स्थापन करण्याचं स्वप्न भंगलं आहे. भाजपाला तेलंगाना विधानसभा निवडणुकीत अपेक्षीत यश मिळवता आलं नाही.
Last Updated : Dec 3, 2023, 5:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details