हैदराबाद/अमरावती - तेलुगु राज्यांमध्ये ( Telugu states sell liquor worth Rs 300 crore ) नवीन वर्षात मद्यविक्री जोरदार झाली आहे. तेलंगानामध्ये 31 डिसेंबरला 172 कोटी रुपयांची दारू लोकांनी ( Telangana liquor consumption ) घेतली आहे. तर शेजारील आंध्रप्रदेशमध्ये 124 कोटी रुपयांची दारू लोकांनी ( Andhra Pradesh liquor consumption ) घेतली आहे.
सुत्रानुसार तेलंगाना व आंध्र प्रदेशमधील मद्यविक्रीचे आकडे सुरुवातीचे ( liquor sales on the eve of new year ) आहेत. हे आकडे अधिक असू शकतात. हैदराबाद आणि तेलंगानामधील अधिकाऱ्यांनी पब, बार आणि दारू विक्रीच्या दुकानांना 31 डिसेंबर रोजी अधिक वेळ वाढवून दिली होती. त्यामुळे दारू विक्रीच्या वेळेत वाढ झाली आहे. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला दारू विक्रीची दुकाने आणि बार रात्री 1 वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी दिली होती. हैदराबाद आणि रंगारेड्डी जिल्ह्यात दारू विक्रीचे सर्वाधिक प्रमाण होते.
हेही वाचा-Investment in Mutual Funds : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून अधिक पैसे कसे कमवावेत ?