पणजी/सिंधुदुर्ग- गेली दीड वर्षे आंतरराष्ट्रीय पर्यटन बंद असल्यामुळे थायलंडला न जाऊ शकलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी पर्यटनासाठी गोव्यात आले आहेत, अशी खोचक टीका भारतीय युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सुर्या यांनी केली. राहुल गांधी हे गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावरून खासदार सुर्या यांनी निशाणा साधला आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
गोव्यात राष्ट्रीय नेत्यांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. तृणमूल पक्षाच्या अध्यक्ष तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यानंतर राहुल गांधीही आज गोव्यात दाखल झालेत. त्यांनी आज खाणींमुळे बाधित व आझाद मैदानात सुरू असणाऱ्या शिक्षकांच्या आंदोलनाला भेट दिली. गोव्यातील स्थानिक दुचाकी चालविणाऱ्या पायलटच्या दुचाकीवरून प्रवास करत राहुल यांनी त्याच्याशी संवाद साधला.
थायलंडचे दरवाजे बंद झाल्याने राहुल गांधी पर्यटनासाठी गोव्यात हेही वाचा-तृणमूलची प्रादेशिक पक्षाशी पडद्याआड; चर्चा राज्यातील बडे नेते ममतांच्या भेटीला
थायलंड बंद म्हणून गोव्यात पर्यटनाला
खासदार तेजस्वी सुर्या म्हणाले, की काँग्रेसला राज्यात आणि देशात नेतृत्व नाही. बिन भरवशाचा पक्ष अशी काँग्रेसची ओळख आहे. काँग्रेस नेते पक्षाचे काम सोडून पर्यटनासाठी जगभर प्रवास करतात. थायलंडचे पर्यटन बंद असल्यामुळे राहुल गांधी यांची दीड वर्षे पंचायत झाली होती. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर पॉलिटिकल टूरिझम करण्यासाठी राहुल गांधी गोव्यात आले असल्याचा टोला खासदार तेजस्वी सुर्या यांनी राहुल यांना लगावला.
हेही वाचा-गोव्यात तृणमूलकडून तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न सुरू, प्रादेशिक नेते ममता बॅनर्जींच्या भेटीला
टीएमसी म्हणजे - टेरिझम, माफिया आणि करपशन
बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना राज्य पुढे नेण्यासाठी कोणतेही व्हिजन नाही. त्या फक्त हिंसाचार आणि दादागिरीच्या जोरावर राज्य चालवतात. असे सांगत त्यांनी टी एम सि म्हणजे - टेरिझम, माफिया आणि करप्शन असल्याची टीका खासदार तेजस्वी सूर्या यांनी केली. याच्या जोरावर टीएमसी (तृणमूल काँग्रेस पक्ष) दहशत माजविण्याचा प्रयत्न करत असल्याचेही तेजस्वी सुर्या यांनी सांगितले.
हेही वाचा-इंधन दरवाढीवरून निशाणा साधणाऱ्या राहुल गांधींचा दुचाकीने पणजीत प्रवास
आम आदमी फक्त पोस्टरवर
राज्यात आलेल्या आम आदमी पक्षाने फक्त डिजिटल आणि बॅनरवर आपले काम सुरू केले आहे. या पक्षाला दिल्ली बाहेर कोणीही विचारत नसल्याचे सांगत सुर्या यांनी आपल्या भाषणात सगळ्याच राजकीय पक्षांचा समाचार घेतला.
भाजप 2022 मध्ये 22 जागा निवडून आणणार
राज्यात बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 2022 च्या निवडणुकीत 22 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळविणासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपने आयोजित केलेल्या मुख्यमंत्री चषकाचे खासदार तेजस्वी सुर्या यांनी उद्घाटन केले. या चषकाच्या माध्यमातून चाळीसही मतदारसंघात फुटबॉल आणि क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले आहे. भारतीय युवा मोर्चाच्यावतीने संपूर्ण गोव्यात या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
गोव्यात तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न-
राज्यात तिसऱ्या आघाडीच्या चाचपणीसाठी राज्यातील बड्या नेत्यांनी ममता बॅनर्जींची सदिच्छा भेट घेतली. गुरूवारी गोव्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी सकाळी स्थानिक मच्छिमार बांधवांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या. तसेच संध्याकाळी गोव्यातील विविध धार्मिक स्थळांना भेट देऊन आपण हिंदू असल्याचा नारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.