पाटणा -बिहार विधानसभेतील विरोधी पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर व्यक्तिगत टीका केली. 'मुलगी होण्याच्या भीतीने नितीशकुमारांनी दुसरं मूल होऊ दिलं नाही', असे तेजस्वी यादव म्हणाले. त्यावरून सभागृहात गदारोळ झाला. उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांनी तेजस्वी यांचे विधान लज्जास्पद असल्याचे म्हटलं. सभागृहात अशी विधाने लाजिरवाणी आहेत. तेजस्वी यांनी मर्यादांचे पालन केले पाहिजे. मुख्यमंत्र्यांविषयी अशी कोणतेही भाष्य करणं, हे सभागृहाच्या नियमांच्या विरोधात आहे, असे ते म्हणाले.
निवडणूक सभांमध्ये नितीश कुमार लालूंच्या 9 मुलांबद्दल बोलले होते. मुलीवर विश्वास नव्हता. म्हणून लालूंनी मुलासाठी 9 अपत्य जन्माला घातले, असे नितीश म्हणाले होते. त्यावर आज तेजस्वी यांनी प्रतिउत्तर दिलं. नितीशकुमार यांना मुलगी होण्याची भीती होती का, त्यामुळे नितीशकुमार यांनी दुसरे मूल होऊ दिले नाही, असे तेजस्वी यादव म्हणाले. त्यानंतर सभागृहात गोंधळ उडाला.
तेजस्वी यांच्या विधानानंतर विरोधी पक्षातील सदस्यांमध्ये आणि सत्ताधारी पक्षामध्ये जोरदार वादावादी झाली. परिवर्तनाच्या आदेशाबद्दल आम्ही जनतेचे आभार मानतो. शिक्षण, लेखन, औषध, सिंचन आणि कृती या मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली. 10 लाख लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिलं. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बरीच नावे ठेवली, असे विरोधी पक्षांन म्हटलं.