पाटणा : बिहारचे वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांच्या कारला काल रात्री उशिरा अपघात झाला. (Tej Pratap Yadav Car accident). ते पाटणाच्या IGIMS मध्ये आले असताना त्यांच्या कारला धडक बसली. (Tej Pratap Yadav Car accident in Patna). घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, मंत्री तेज प्रताप यांचे अधिकृत वाहन रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डसमोर उभे होते. तेज प्रताप इमर्जन्सी वॉर्डातून बाहेर पडत असताना दुसरे वाहन समोर येऊन थांबले. मंत्र्यांच्या अंगरक्षकांनी त्या वाहनाला मागे फिरण्यास सांगितले असता त्या मद्यधुंद कारचालकाने गाडीचा वेग वाढवला आणि समोर उभ्या असलेल्या मंत्र्यांच्या वाहनाला धडक दिली. हे प्रकरण शास्त्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.
चालकाला स्थानिकांची मारहाण : तेज प्रताप यांच्या गाडीला धडक दिल्यानंतर आजूबाजूचे लोक तेथे जमा झाले आणि त्यांनी स्कॉर्पिओ कार चालक आणि त्यामध्ये बसलेल्या अन्य एका व्यक्तीला पकडले. लोकांनी दोघांनाही बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस ठाण्यात ब्रेथ अॅनालायझरने तपासणी केल्यानंतर स्कॉर्पिओ चालकाने मद्य प्राशन केल्याचे निष्पन्न झाले आहे.