नवी दिल्ली: टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघासाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वेगवान गोलंदाज दीपक चहर देखील दुखापतीचा ( Deepak Chahar injured ) बळी ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी सराव सत्रादरम्यान दीपक चहरचा घोटा वळला होता, त्यामुळे तो पहिला वनडे खेळू शकला नाही. विशेष म्हणजे लखनौ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडेत भारताला नऊ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
दीपकची दुखापत भारतासाठी चिंतेचे कारण आहे. आधीच जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा दुखापतींमुळे वर्ल्डकपमधून बाहेर पडले आहेत. दीपक चहर हा देखील जसप्रीत बुमराहच्या जागी टी-20 विश्वचषक 2022 ( T20 World Cup 2022 ) च्या संघात स्थान मिळवण्याच्या दावेदारांपैकी एक आहे. मात्र आता त्याचे विश्वचषक खेळण्याचे स्वप्न अपूर्ण राहू शकते.
निवड प्रकरणांची माहिती असलेल्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, "दीपकच्या घोटा मुरडला आहे, पण ते तितकेसे गंभीर नाही. तथापि, काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला जाऊ शकतो. त्यामुळे टी-20 विश्वचषकाच्या स्टँडबाय यादीत दीपकला खेळवण्याची ( Deepak Chahar stand by player ) जोखीम पत्करायची की नाही, हा निर्णय संघ व्यवस्थापनाचा असेल. पण गरज भासल्यास त्याला प्राधान्य दिले जाईल.
दीपक विश्वचषकासाठी स्टँडबाय -
वेगवान गोलंदाज दीपक चहरची टी-20 विश्वचषक 2022 साठी स्टँड बाय म्हणून निवड करण्यात आली आहे. आशिया चषकात दीपक चहरही स्टँडबाय ( Deepak Chahar also standby in Asia Cup ) होता, मात्र आवेश खानची तब्येत खराब झाल्याने त्याचा संघात समावेश करण्यात आला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेत दीपक चहरचा चमत्कार पाहायला मिळाला. पहिल्या टी-20 सामन्यात त्याने अर्शदीपसह आफ्रिकन संघाचे कंबरडे मोडले. दीपक चहर बॅटनेही योगदान देण्यात पटाईत आहे.