नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना १५ जानेवारीला तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकल्यानंतर भारतीय संघाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आज तिसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाने तिरुवनंतपुरम येथील पद्मनाभस्वामी मंदिरात पूजा केली. सर्व खेळाडूंनी मंदिरात देवाचे आशीर्वाद घेतले आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली.
मंदिरात पूजा : तिरुअनंतपुरम येथे श्रीलंकेविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना खेळण्यासाठी आलेल्या भारतीय क्रिकेट संघातील काही सदस्यांनी शनिवारी श्री पद्मनाभस्वामी मंदिरात प्रार्थना केली. शनिवारी सकाळी १० वाजता काही क्रिकेटपटू आणि बीसीसीआयचे इतर अधिकारी मंदिरात पोहोचले होते. यामध्ये युझवेंद्र चहल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांचा समावेश होता.
केरळची प्रसिद्ध धोती परिधान :क्रिकेटपटूंसह बीसीसीआयचे अधिकारी आणि मंदिराच्या अधिकाऱ्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. तिसरा वनडे रविवारी येथे खेळवला जाणार आहे. मात्र, यावेळी संघाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह अनेक स्टार खेळाडू उपस्थित नव्हते. टीम इंडियाच्या खेळाडूंचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये भारतीय क्रिकेटपटूंनी केरळची प्रसिद्ध धोती परिधान केल्याचे दिसून येते.
ईशान आणि सूर्यकुमारला संधी मिळेल का? : पाहुणा संघ श्रीलंकेला धूळ चारण्यासाठी टीम इंडिया रविवारी तिरुअनंतपुरममध्ये मैदानात आक्रमकपणे उतरणार आहे. या वनडे मालिकेतील दोन सामने भारताने जिंकले आहेत. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना गुवाहाटी येथे आणि दुसरा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे खेळला गेला. हा सामना अतिशय रोमांचक असणार आहे. पहिले दोन सामने जिंकल्यानंतर आता तिसऱ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा बेंच स्ट्रेंथ तपासण्यासाठी प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो. मालिकेतील या शेवटच्या सामन्यात इशान आणि सूर्यकुमार यादव यांना संधी मिळू शकते. T20 मध्ये, वेगवान फलंदाज सूर्यकुमार यादवने श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात शतक झळकावले. बांगलादेश दौऱ्यात सर्वात वेगवान द्विशतक झळकावण्याचा विक्रम इशान किशनच्या नावावर आहे.