गया (बिहार) Teachers Day २०२३ :बिहारच्या गयामध्ये आजही गुरुकुल शिक्षणाची परंपरा आहे. येथील बाराचट्टीच्या कोहवारी जंगलात एक जोडपं गुरुकुल चालवतंय. या गुरुकुलात मुलांना केवळ मुळाक्षरांचं ज्ञान दिलं जात नाही, तर त्यांना निसर्ग, प्राणी, पक्षी, शेती, प्राणी यासह इतर माहितीही अवगत करून दिली जाते. मोठी गोष्ट म्हणजे येथील जंगलात केल्या जाणाऱ्या शेतीत हे लहान मुलंही मदत करतात. अशाप्रकारे येथील मुलं लहान वयातच खूप काही शिकत आहेत.
गुरुकुल पद्धतीचं शिक्षण देणारी हीच ती शाळा पती-पत्नी मिळून जंगलात गुरुकुल चालवतात : कोहवारी जंगलात अनिल कुमार आणि त्यांची पत्नी रेखा देवी सहोदय ट्रस्ट चालवतात. हे ट्रस्ट गेल्या अनेक वर्षांपासून मुलांना गुरुकुल पद्धतीनं शिक्षण देत आहे. येथे मुला-मुलींना निवासी धर्तीवर शिक्षण दिलं जातं. सर्वसाधारणपणे, जंगलात राहणारी मुलं शिक्षणापासून दुरावलेली पाहायला मिळतात. मात्र सहोदय ट्रस्ट चालवणारे हे पती-पत्नी बाकीच्यांपेक्षा वेगळे आहेत.
गुरुकुल पद्धतीचं शिक्षण देणारी हीच ती शाळा शाळेची फी फक्त १ किलो तांदूळ : या दाम्पत्याने शिक्षणाचा प्रकाश पसरवण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्यामुळे आता जंगलात राहणार्या मुलांना मुळाक्षरांच्या शिक्षणाबरोबरच इतर ज्ञानही मिळत आहे. या मुलांचा आत्मविश्वास बघितला तर त्यांच्या मनात कसलाही संकोच नाही हे दिसून येतं. या मुलांमध्ये पुरेसे संस्कारही आहेत. कोणी आत येताच हे मुलं हात जोडून नमस्कार करतात. येथील फी जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. येथे मुलं निवासी शिक्षण घेतात, परंतु याची फी महिन्याला फक्त १ किलो तांदूळ आहे! 'आम्ही इथे अभ्यास करतो. यासोबतच आम्हाला खेळणी बनवणे, पेंटिंग आणि बागकाम यासंबंधीची इतर माहितीही दिली जाते. आम्हाला शेतीबद्दलही भरपूर ज्ञान आहे. प्राण्यांबद्दलही माहिती आहे. येथे आम्हाला चांगलं शिक्षण दिलं जातं', असं विद्यार्थी सांगतात.
हेही वाचा :Teachers Day २०२३ : शिक्षक दिनानिमित्त आयुक्त आणि विद्यार्थ्यांची अदलाबदली! पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अनोखा उपक्रम
जंगलाच्या कुशीत वसलं आहे : कोहवारी जंगलात पोहोचणं तसं अवघड आहे. येथे जायला आजही रस्ता नाही. पायवाट किंवा बारीक कच्चा रस्ता हाच एकमेव आधार आहे. हे ठिकाण जंगलाच्या कुशीत वसलेलं आहे. येथं गरीब मागास समाजाची वस्ती आहे. इथली मुलं पूर्वी निरक्षर असायची, ती आता साक्षर होत आहेत. विनोबा भावे यांनी दान केलेल्या जमिनीवर शेतीतून मिळालेल्या पैशातून येथं इमारत बांधण्यात आली. या इमारतीत मुले शिकतात आणि खेळतात. तसेच मुलांना शेती, बागकाम, पशुसंवर्धन आणि इतर माहिती दिली जाते.
नोकरी सोडली आणि शिकवायला सुरुवात केली :सहोदय ट्रस्टचे अनिल कुमार सांगतात की, २०१६-१७ मध्ये त्यांना शहर सोडावं लागलं. ते दिल्लीत काम करायचे, पण त्यांचं मन जंगल आणि ग्रामीण भागातच लागलं होतं. अशातच एके दिवशी ते बाराचट्टीच्या कोहवारी वनक्षेत्रात आले आणि त्यांनी विनोबा भावे यांनी दान केलेली जमीन लोकांच्या संमतीनं गरीब मुलांच्या शिक्षणासाठी वापरण्यास सुरुवात केली.
आज येथे जवळपास तीन डझन मुलं शिक्षण घेतात. ती येथे येऊन फक्त शिकत नाहीत, तर बागकाम, शेती, पशुपालन यासह इतर माहितीही मिळवतात. सध्या माझी पत्नी रेखा कुमारी या शाळेत शिकवत आहे. आम्ही दोघं मिळून ही शाळा चालवतो. यासाठी आम्हाला स्थानिक लोकांचाही पाठिंबा मिळतो. - अनिल कुमार, संचालक, सर्वोदय ट्रस्ट.
अनिल कुमार आणि त्यांची पत्नी रेखा देवी सर्वांगीण जीवनावर आधारित शिक्षण : सहोदय ट्रस्टच्या संचालिका रेखा कुमारी सांगतात की, त्या मुलांना सर्वांगीण जीवनावर आधारित शिक्षण देतात. 'मुलांना पुस्तकांचे फायदे तसेच बांबू आणि मातीपासून खेळणी बनवण्यासारखं इतर शिक्षण दिलं जातं. त्यांना फलोत्पादन आणि शेतीशी संबंधित माहितीही दिली जाते. त्यांच्या मदतीनंच शेतीतून धान्य पिकवलं जातं, असं रेखा कुमारी यांनी सांगितलं.
हेही वाचा :Teachers Day २०२३ : शिक्षक दिनाचा काय आहे इतिहास? कोणत्या देशात कधी साजरा केला जातो? घ्या जाणून...