मंगळुरू(कर्नाटक) - अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या एका शिक्षकाला अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने (FTSC-1) शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश मंजुळा इट्टी यांनी दोषीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कुलई येथे राहणाऱ्या ३३ वर्षीय पृथ्वीराजवर एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरतकल पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, त्याने 1 ऑगस्ट 2014 ते 2 सप्टेंबर 2016 या कालावधीत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला होता.
कसे उघड झाले प्रकरण - सुरुवातीला पृथ्वीराजने विद्यार्थिनीला घरी बोलावून अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले. हा प्रकार कोणाला सांगितल्यास परीक्षेत नापास करण्याची धमकी तिला दिली होती. दरम्यान, संबंधित विद्यार्थिनीच्या प्रायव्हेट पार्टला दुखापत झाल्याने कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेले. तिथे गेल्यावर पीडित विद्यार्थिनीने संबंधित प्रकाराची सर्व माहिती कुटुंबीयांना आणि डॉक्टरांना दिली. यानंतर हा सर्व प्रकार समोर आला होता.
जन्मठेपेची शिक्षा सुनावली - सुरतकल पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक चेलुवराज बी यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. न्यायाधीश मंजुळा यांनी पृथ्वीराजला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.