महाराष्ट्र

maharashtra

VIRAL VIDEO : शिक्षिकेने विद्यार्थिनीला हिजाब काढायला सांगितले; दिल्लीतील प्रकार

By

Published : Feb 23, 2022, 9:01 PM IST

कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्याबाबत सुरू असलेला वाद अजूनही संपलेला नाही तोच दिल्लीत हिजाबबाबत वाद सुरू झाला आहे. ( Hijab Issue ) सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ( Hijab Issue Video Viral ) ज्यामध्ये एका विद्यार्थिनीने हिजाब घातल्याचे सांगितले आहे.

HIJAB
हिजाब

नवी दिल्ली -कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्याबाबत सुरू असलेला वाद अजूनही संपलेला नाही तोच दिल्लीत हिजाबबाबत वाद सुरू झाला आहे. ( Hijab Issue ) सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ( Hijab Issue Video Viral ) ज्यामध्ये एका विद्यार्थिनीने हिजाब घातल्याचे सांगितले आहे. त्यावर शिक्षक म्हणाले की, उद्यापासून हिजाब घालून वर्गात येऊ नका. याबाबत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अद्यापपर्यंत काहीही झाले नाही.

व्हायरल व्हिडिओ

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्याचे म्हणणे आहे की, शिक्षक म्हणाले की उद्यापासून स्कार्फ घालून येऊ नकोस, आई बनू नकोस. याशिवाय शाळेत आणखी दोन विद्यार्थिनींचे स्कार्फ काढण्यात आल्याचे विद्यार्थिनीने सांगितले. दिल्लीत महापालिका निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत हिजाब प्रकरण तापण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओच्या सत्यतेची ईटीव्ही भारत पुष्टी करत नाही.

काय आहे हिजाब वाद ?

उडुपी आणि चिकमंगळुर शहरातील महाविद्यालयामध्ये काही विद्यार्थिनींनी वर्गात हिजाब परिधान करायला सुरुवात केली आणि जानेवारीमध्ये या वादाला सुरुवात झाली. 28 डिसेंबर 2021 ला पहिली घटना उडुपीमध्ये घडली होती. त्यानंतर 5 शैक्षणिक संस्थानी विद्यार्थिनींना हिजाब घालून प्रवेश करण्यास मनाई केली. तर यावर कर्नाटक शिक्षण कायदाचा दाखला देत सरकारने म्हटले, की सर्वांनी एकाच प्रकारचे कपडे घालणे बंधनकारक आहे. कर्नाटक शिक्षण कायद्यानुसार शैक्षणिक संस्था आणि शालेय विकास आणि नियमन समितीला विद्यार्थ्यांचे गणवेश ठरवण्याचा अधिकार असल्याचे कर्नाटकच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी म्हटले.

हेही वाचा -Hijab Controversy In Maharashtra : हिजाब समर्थनार्थ महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात झाले आंदोलन, वाचा सविस्तर...

यानंतर वाद चिघगळला उडुपीमधल्या खासगी कॉलेजच्या बाहेर विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये घोषणाबाजी आणि वादावादी झाली. दोन गट एकमेकांसमोर आल्यानंतर संबंधित महाविद्यालय उच्च न्यायालयाचा याविषयीचा निकाल येईपर्यंत बंद करण्यात आले. शिवाय कर्नाटकच्या इतरही जिल्ह्यामध्ये यावरुन दगडफेकी सारख्या घडल्या आहेत. या संपूर्ण प्रकारानंतर राज्य सरकारच्या निर्णयानुसार दोन शाळा आणि महाविद्यालय बंदच ठेवले.

ABOUT THE AUTHOR

...view details