महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Tata Sons Chairman Letter : 69 वर्षानंतर एअर इंडिया टाटाच्या ताब्यात, कर्मचाऱ्यांना पुन्हा सुवर्णकाळ येण्याचे कंपनीकडून संकेत

टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखर यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या ( Tata Sons chairman letter to AI staff ) म्हटले, की आपला प्रवास आता सुरू ( Tata chief says journey starts now ) झाला आहे. जे भूतकाळात चांगले आहे, त्याचे जतन करायला हवे. सतत बदल करायला हवा. संपूर्ण देशाचे आमच्यावर लक्ष आहे. एकत्रितपणे आम्ही काय करू शकतो, याची प्रतिक्षा करत आहोत.

By

Published : Jan 27, 2022, 9:10 PM IST

एअर इंडियाचे चेअरमन
एअर इंडियाचे चेअरमन

नवी दिल्ली - एअर इंडियाची मालकी ही टाटा सन्स कंपनीकडे आली आहे. त्यावर टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एअर इंडियाचे कुटुंबात स्वागत आहे. एअर इंडियाला येत्या काळात सुवर्ण काळ असल्याचेही चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी ( Tata Chairman on Air India ) म्हटले आहे.

टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखर यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या ( Tata Sons chairman letter to AI staff ) म्हटले, की आपला प्रवास आता सुरू ( Tata chief says journey starts now ) झाला आहे. जे भूतकाळात चांगले आहे, त्याचे जतन करायला हवे. सतत बदल करायला हवा. संपूर्ण देशाचे आमच्यावर लक्ष आहे. एकत्रितपणे आम्ही काय करू शकतो, याची प्रतिक्षा करत आहोत. संपूर्ण देशाचे वाहतूक क्षेत्र बांधणीसाठी आपल्याला भविष्याकडे पाहावे लागेल, असे टाटा सन्सचे चेअरमन यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा-Covishield - Covaxin For Adults: प्रौढांवरील वापरासाठी कोरोना लसीला मान्यता

एन. चंद्रशेखरन यांनी एअर इंडियाच्या प्रवासाची सांगितली आठवण

टाटा सन्सचे चेअरमन यांनी ( N Chandrasekharan letter to Air India Employees ) पत्रात म्हटले, की 8 ऑक्टोबर 2021 रोजी एअर इंडियाची घोषणा केल्यापासून प्रत्येकाच्या मुखात एकच शब्द आहे. एअर इंडिया स्वगृही परतत आहे. आता नवीन धड्याची सुरुवात आहे. टाटा ग्रुपच्यावतीने मी पत्र लिहित आहे. तुमचे कुटुंबात स्वागत आहे. डिसेंबर 1986 मध्ये एअर इंडियामधून पहिल्यांदा प्रवास केल्याची त्यांनी आठवण सांगितली. तेव्हा किती खास वाटले याची आठवण विसरू शकत नाही.

हेही वाचा-Bengaluru Youth Commits Suicide : आक्षेपार्ह फोटो शेयर करण्याची धमकी दिल्याने २४ वर्षीय युवकाची आत्महत्या

पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंच्या कारकीर्दीत एअर इंडियाचे झाले होते खासगीकरण-

केंद्र सरकारने 69 वर्षानंतर एअर इंडिया ही टाटाकडे सुपूर्द केली आहे. टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली आहे. टाटा ग्रुपचे चेअरमन जे. आर. डी. टाटा यांनी एअर इंडियाची 1932 मध्ये स्थापना केली होती. मात्र, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात 1953 मध्ये एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण झाले.

हेही वाचा-Delhi Gangraped : घृणास्पद, बलात्कारानंतर मुंडन करून तोंडाला काळे फासले अन् चप्पलांचा हार घालून मिरवणूक काढली

ABOUT THE AUTHOR

...view details