नवी दिल्ली –केंद्र सरकारकडून एअर इंडियाच्या खासगीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. एअर इंडियाच्या बोलीत टाटा ग्रुपने रस दाखविला आहे. एअर इंडिया खरेदीसाठी टाटा ग्रुप आज स्वारस्यनिविदा (खरेदी करण्यात स्वारस्य असण्यासंबधित औपचारिकरित्या दाखल केलेले कागदपत्रे) दाखल करणार आहे. टाटा, अडानी आणि हिंदुजाही बोली लावणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. सरकारने मुदतवाढ केली नसून एअर इंडियासाठी बोली लावण्याची आजची शेवटची तारिख आहे.
टाटा ग्रुपने एअर इंडियाचं मूल्यांकन करण्यास सुरूवात केली आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत टाटा ग्रुप एअर इंडियासाठी बोली लावेल असं मानलं जात आहे. सरकारने एअर इंडियासाठी बोली लावणाऱ्याकरिता औपचारिक तारिख 5 जानेवरी केली आहे. यापूर्वी ती तारिख 29 डिसेंबर होती. 29 डिसेंबरला शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या बिल्डर्सच्या नावांची घोषणा करण्यात येणार आहे.
2019 मध्ये विक्री करण्याचा प्रयत्न -
केंद्र सरकारने एअर इंडियाची 2019 मध्ये विक्री करण्याचा प्रयत्न केला होता. केंद्र सरकारने जानेवारी 2020 पासून एअर इंडियामध्ये निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू केली. यामध्ये एअर इंडियामधील 50टक्के हिस्सा विकणे व एअर इंडिया एक्सप्रेसमधील 100 टक्के हिस्सा विकणे आदींचा समावेश आहे.