नवी दिल्ली - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अत्याचाराच्या घटनेबाबत महिलांच्या कपड्याला दोष दिला आहे. त्यांच्या या विधानावर चौफेर टीका होत आहे. प्रख्यात बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनीही इम्रान खान यांचा चांगलाच समाचार घेतला. तस्लीमा नसरीन यांनी इम्रान खान यांचा एक शर्टलेस फोटो शेअर करून जशाच तसे सडेतोड उत्तर दिले आहे.
'जर एखाद्या पुरुषाने फार अगदी कमी कपडे घातले असतील तर त्याचा स्त्रियांवर परिणाम होतो. रोबोट असल्यास हे घडणार नाही', असे टि्वट तस्लीमा नसरीन यांनी केले. यासोबत त्यांनी इम्रान खान यांचा शर्टलेस फोटो शेअर केला.
इम्रान खान यांनी बलात्काराच्या आणि अत्याचारांच्या घटनांचा संबंध थेट महिलांच्या कपड्यांशी जोडला आहे. 'जर एखादी महिला खूपच कमी कपडे परिधान करत असेल, तर त्याचा पुरुषांवर परिणाम होईल. त्या रोबोट असल्यास हे घडणार नाही. हा कॉमन सेन्स आहे, असे इम्रान खान म्हणाले. त्यांचे हे विधान सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालं आहे. सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून जोरदार टीका होत आहे.