कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्षात असलेल्या भाजपने 2024 च्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी सीपीआयप्रमाणेच (मार्क्सवादी) भाजप रणनीती आखणार आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप पूर्णवेळ विस्तारक नेमणार आहे. त्यांना दरमहा 6 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. हे विस्तारक पश्चिम बंगालमधील 78 हजार बुथसाठी काम करणार आहेत. भाजपचा तळागाळात प्रसार-प्रचार करण्याची विस्तारकांवर जबाबदारी देण्यात येणार आहे.
भाजपने पश्चिम बंगालमध्ये 2019 लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली होती. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी विस्तारक नेमण्याचा विचार केला. मात्र, 2021 मध्ये भाजपचे विस्तारक नेटवर्क हे असंघटित होते. त्यामुळे भाजपला निवडणुकीत अपेक्षित परिणाम दिसून आला नाही. 2024 मधील लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. हे लक्षात घेऊन भाजपने सीपीआयप्रमाणे नेटवर्कचे संघटन करण्याचे नियोजन केले आहे.
हेही वाचा-एसईबीसी आणि ईएसबीसी उमेदवारांच्या रखडलेल्या नियुक्त्या कायम; राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय
पक्षाचे बुथपातळीवर नेटवर्क कमकुवत असल्याने भाजपला विधानसभा निवडणुकीत अपयश