बाडमेर (राजस्थान) - राज्यासह संपूर्ण देशात कोरोनाच्या या महासंकटात ऑक्सिजनअभावी अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. याच परिस्थितीत जिल्ह्यातील रिफायनरी क्षेत्रातील 3 ऑक्सिजन फ्लांट ऑक्सिजन लिक्विडच्या अभावामुळे बंद आहे. यासंबंधित बातमी ईटीव्ही भारतने प्रकाशित केली होती. यानंतर स्थानिक प्रशासनाने सरकारला पत्रही लिहिले होते.
ईटीव्ही इम्पॅक्ट : बाडमेर रिफायनरीत पोहोचला ऑक्सिजन लिक्विड टँकर; बंद पडलेले तीन प्लांट होणार सुरू - बाडमेर रिफायनरी प्रकल्प ऑक्सिजन लिक्विड
मंत्री हरिश चौधरी यांनी यासंबंधित प्रकरणाचा तपास सुरू केला. यानंतर एक लिक्विड टँकर पदपचरा रिफायनरी येथे पोहोचला आहे. यामुळे हे ऑक्सिजन प्लांट पुन्हा सुरू होणार आहे. यामुळे कोरोनाबाधितांना मदत होणार आहे. माहिती नुसार या टँकरमध्ये जवळपास 3 टन ऑक्सिजन लिक्विड आले आहे.
![ईटीव्ही इम्पॅक्ट : बाडमेर रिफायनरीत पोहोचला ऑक्सिजन लिक्विड टँकर; बंद पडलेले तीन प्लांट होणार सुरू BADMER OXYGEN PLANT](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12:35:25:1619766325-11587240-harish.jpg)
यानंतर मंत्री हरिश चौधरी यांनी यासंबंधित प्रकरणाचा तपास सुरू केला. यानंतर एक लिक्विड टँकर पदपचरा रिफायनरी येथे पोहोचला आहे. यामुळे हे ऑक्सिजन प्लांट पुन्हा सुरू होणार आहे. यामुळे कोरोनाबाधितांना मदत होणार आहे. माहिती नुसार या टँकरमध्ये जवळपास 3 टन ऑक्सिजन लिक्विड आले आहे.
मंत्री हरिश चौधरी यांनी सांगितले की, देशात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. बाडमेर येथे आलेल्या ऑक्सिजन लिक्विड टँकरमुळे येथील रुग्णांना मदत होणार आहे. तसेच त्यांना जनतेने कोरोनाच्या नियमावलीचे पालन करावे, तसेच लसीकरण करावे, असे आवाहन जनतेला केले आहे. दरम्यान, बाडमेर येथील या ऑक्सिजन प्लांट येथे गुजरात येथून लिक्विड पुरवठा करण्यात येत होता. मात्र, आता गुजरात सरकारने प्रतिबंध यामुळे हे प्लांट बंद आहेत. ईटीव्ही भारतने याबाबत बातमी प्रकाशित केल्यानंतर प्रशासकीय स्तरावर प्रयत्न करण्यात आले. यानंतर एक लिक्विड टँकर पदपचरा रिफायनरी येथे पोहोचला आहे.