महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Tamilian actress Deepa suicide तमीळ अभिनेत्री दीपाची आत्महत्या - Tamilian actress Deepa

'थुप्परीवलन या गाजलेल्या तमीळ चित्रपटातील अभिनेत्री दीपाने आत्महत्या केल्याची ( Tamilian actress Deepa suicide ) घटना रविवारी घडली. त्यामुळे तमीळ चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. दीपाने अनेक तमीळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचा नुकताच प्रदर्शित झालेला 'वैधा' हा चित्रपट आहे.

Tamilian actress Deepa aka Pauline Jessica dies of suicide at 29
Tamilian actress Deepa aka Pauline Jessica dies of suicide at 29

By

Published : Sep 18, 2022, 7:04 PM IST

चेन्नई : तमीळ अभिनेत्री दीपा उर्फ पॉलीन जेसिका ही रविवारी चेन्नईतील तिच्या घरात मृतावस्थेत ( Tamil actress Deepa suicide ) आढळून आली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना तिच्या घरातून सुसाइड नोट सापडली. तिच्या आत्महत्येमागे प्रियकरासोबतचे मतभेद असल्याचे सांगत तिने चिठ्ठीत प्रेमप्रकरणाचा उल्लेख केला आहे.

दीपाने तिच्या पालकांच्या कॉललाप्रतिसाद देणे थांबवल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. दीपाचा मित्र प्रभाकरशी तिच्या कुटुंबियांनी संपर्क साधला. त्यानंतर प्रभाकरन तिला पाहण्यासाठी विरुगंबक्कमठे परिसरातील मल्लीगाई अव्हेन्यू येथे असलेल्या तिच्या घरी गेला तेव्हा ती त्याला मृतावस्थेत आढळली.

पोलीस अधिकार्‍यांनी मृतदेहाजवळून एक सुसाइड नोटजप्त केली. त्यात दीपाने नमूद केले आहे की, तिचे कोणाशी तरी प्रेमसंबंध बिघडले होते. ज्यामुळे तिने आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. तिच्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नसल्याचेही तिने नमूद केले.

या घडामोडींनंतर दीपाचा भाऊ दिनेशयाने कोयंबेडू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 29 वर्षीय अभिनेत्री दीपाने अनेक तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यात तिचा नुकताच प्रदर्शित झालेला 'वैधा' हा चित्रपट आहे. 'थुप्परीवलन' चित्रपटात तिच्या आणखी एका महत्त्वपूर्ण भूमिकेचे कौतुक झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details