चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी राज्यातील वेल्लोर फोर्ट कॉम्प्लेक्समध्ये एका महिलेला हिजाब काढण्यास भाग पाडल्याचे प्रकरण समोर आले आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलासह सात जणांना अटक केली आहे. वेल्लोरचे एसपी एस. राजेश कन्नन यांनी सांगितले की, जाणूनबुजून अपमान आणि बदनामी केल्याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच, एसपी पुढे म्हणाले की, या लोकांनी वैयक्तिक स्वातंत्र्याविरुद्ध कृत्य केले.
एक महिला मित्रासोबत गडावर पोहोचली : संतोष, इम्रान पाशा, मोहम्मद फैसल, इब्राहिम बाशा, मोहम्मद फैसल आणि सी. प्रशांत अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले बहुतांश स्थानिक रिक्षाचालक असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 मार्च रोजी दुपारी हिजाब घातलेली एक महिला मित्रासोबत गडावर पोहोचली तेव्हा ही घटना घडली. अटक केलेले लोकही येथे पोहोचले आणि तिला हिजाब काढण्यास सांगितले.
स्त्रियांच्या शिष्टाचाराच्या विरोधात : यामध्ये एकाने फोनवर या घटनेचे चित्रीकरण केले आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केले जे व्हायरल झाले. बुधवारी ग्राम प्रशासकीय अधिकारी (VAO) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वेल्लोर उत्तर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुरुवारी पाच विशेष पथके तयार करून गुन्हेगारांना अटक केली आहे. सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आणणे, वैयक्तिक स्वातंत्र्य धोक्यात आणणे, दोन वर्गातील लोकांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे आणि स्त्रियांच्या शिष्टाचाराच्या विरोधात काम करणे या आरोपाखाली सात जणांना अटक करण्यात आली आहे.
तामिळनाडू महिला छळ प्रतिबंध कायदा :यामध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ क्लिपिंग शेअर करू नका, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. तसेच, असे करणाऱ्यांवर तामिळनाडू महिला छळ प्रतिबंध कायदा आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल. तसेच, या घटनेचा पुढील तपास सुरु राहील असही वेल्लोरचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे.
हेही वाचा:भाजपच्या आमदाराने भर विधानसभेतच पाहिले 'पॉर्न व्हिडिओ', सोशल मीडियावर झाला व्हायरल