महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भाड्याच्या घरात राहणाऱ्या वृद्ध महिलेच्या नावे 8 कोटी रुपयांची करचोरी!

तामिळनाडूच्या तिरुपथूर येथे भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या नावावर चक्क आठ कोटी रुपयांचा कर चुकविल्याचे पत्र आले. (old woman notice of Tax evasion of Rs eight crore). त्यानंतर घाबरून त्या महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. (Tamil Nadu old woman notice of Tax evasion). वाचा संपूर्ण बातमी..

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Dec 21, 2022, 10:32 PM IST

थिरुपत्तूर (तामिळनाडू) : गुलजार (60) ही पेरियांगुप्पम गांधी नगर येथील रहिवासी आहे. ती विधवा असून तिला एक मुलगा व एक मुलगी आहे. तिचा मुलगा अपंग असून मुलगी हृदयरोगी आहे. हे तिघेही भाड्याच्या घरात राहतात. 19 डिसेंबर रोजी चेन्नई येथील दोन महिला सरकारी अधिकारी गुलजार यांच्या घरी आल्या. त्यांनी गुलजार यांना सांगितले की, 'तुम्ही चांदोरकुप्पम भागात I.S.Enterprise नावाची कंपनी चालवली आहे आणि त्यात 8 कोटींचा कर चुकवला आहे!'. (Tamil Nadu old woman notice of Tax evasion). त्यांनी तात्काळ कर भरावा आणि न भरल्यास प्रतिदिन 500 रुपये दंड भरावा लागेल, असे पत्रही पाठवले. (old woman notice of Tax evasion of Rs eight crore). यामुळे धास्तावलेल्या गुलजार यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र परिसरातील तरुणांनी वृद्ध महिलेला समजावून आत्महत्येपासून परावृत्त केले.

आजुबाजुच्या गावांमध्ये देखील अशा घटना उघडकीस : त्यानंतर परिसरातील नागरिकांनी याप्रकरणी अंबूर ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. महिलेच्या कागदपत्रांचा वापर करून बनावट कंपनी चालवणाऱ्या करचुकव्यांवर कारवाई करावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. आजूबाजूच्या अमपूर व वानियांबडी या गावांमध्ये देखील अनेकांना जीएसटी कर भरावा, अशा आदेशाची पत्रे आली आहेत. याबाबत जिल्हा पोलीस विभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details