महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Tamil Nadu Landslide: तामिळनाडूत मोठे भूस्खलन.. १० गावांचा संपर्क तुटला.. - तामिळनाडूत भूस्खलनाने १० गावांचा संपर्क तुटला

Tamil Nadu Landslide: तामिळनाडू राज्यातील निलगिरी Nilgiri District Tamil Nadu जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले Landslide Cuts Off 10 Villages TN आहे. यामुळे आसपासच्या १० गावांचा संपर्क तुटला आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.

TAMIL NADU HEAVY LANDSLIDE CUTS OFF 10 VILLAGES IN NILGIRI DISTRICT
तामिळनाडूत मोठे भूस्खलन.. १० गावांचा संपर्क तुटला..

By

Published : Dec 22, 2022, 5:12 PM IST

उधगमंडलम (तामिळनाडू):Tamil Nadu Landslide: तामिळनाडूतील निलगिरी जिल्ह्यातील Nilgiri District Tamil Nadu कुक्कलथोराई येथे भूस्खलन झाल्यामुळे कोठागिरी रोड मुख्य रस्ता पूर्णपणे ठप्प झाला आहे. महामार्ग विभाग, जिल्हा प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन व मदत विभाग हे ढिगारा हटवण्याचे काम करत आहेत. Landslide Cuts Off 10 Villages TN

निलगिरी जिल्ह्यातील कुक्कलथोराईच्या आजूबाजूच्या दहा गावांचा गुरुवारी कोठागिरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याने मुख्य रस्त्यापासून संपर्क तुटला. या घटनेची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ते म्हणाले की, 10 गावांना, शहरांना जोडणारे रस्ते पूर्णपणे ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत, उधगमंडलम पंचायतीच्या अंतर्गत असलेल्या गावांमध्ये वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

उईलहट्टी धबधब्याजवळ 200 मीटरपर्यंत पसरलेल्या भूस्खलनामुळे कोठागिरी आणि आसपासच्या चहाच्या बागा आणि शेतजमीनही वाहून गेली. भूस्खलनामुळे 10 गावे बाधित झाली. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, प्राथमिक तपासात शेतात पाणी साचणे, पाण्याच्या टाक्या आणि तलावांचे बांधकाम ही भूस्खलनाची प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे.

महामार्ग विभाग, जिल्हा प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन व मदत विभागाचे अधिकारी व कर्मचारी ढिगारा हटविण्यास मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. मात्र, ढिगारा हटवताना दरड कोसळण्याची भीती असल्याने काम संथगतीने सुरु आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details