नवी दिल्ली - भाजप, नंतर काँग्रेस आणि नंतर जेडीयूसह विविध राजकीय पक्षांसाठी निवडणूक रणनीतीकार असलेले प्रशांत किशोर आता इतरांसाठी रणनीती बनवणार नाहीत. प्रशांत किशोर आता त्यांच्या स्वत: पक्ष काढतील अशी चर्चा सुरू झाली आहे. (Prashant Kishor tweet) किशोर यांची नवीन पक्षाची स्थापना करण्याचे संकेत आपल्या ट्विटरवरु दिले असल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. किशोर यांनी सोमवारी ट्विट करून जनतेमध्ये जाण्याची वेळ आली असल्याचे म्हटले आहे. तसेच, त्याची सुरुवात बिहारपासून होईल असही ते म्हणाले आहेत.
प्रशांत किशोर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "लोकशाहीत प्रभावी योगदान देण्याची आणि लोकांप्रती कृती धोरणे तयार करण्यात मदत करण्याची त्यांची भूक खूप चढ-उतार झाली आहे. आता लोकांमध्ये जाण्याची वेळ आली आहे. म्हणजेच, लोकांमध्ये जेणेकरुन त्यांच्या समस्या चांगल्या प्रकारे समजून घेऊन 'जन सुरज'च्या मार्गावर वाटचाल करता येईल असही ते म्हणाले आहेत.
काँग्रेसमधील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर प्रशांत किशोर म्हणजेच पीके राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर राजकारणात मोठा बदल घडवण्याच्या तयारीत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांची पार्टी पूर्णपणे आधुनिक, डिजिटल असेल आणि जनसंपर्क करण्याच्या नवीन प्रगत तंत्रज्ञानासह लॉन्च केली जाईल. पक्षाचे नाव काय असेल याबद्दल कोणतीही अंतिम चर्चा नाही. परंतु, सूत्रांनी सांगितले की पीके एक-दोन वर्षांत त्यांचा राजकीय पक्ष सुरू करणार आहे.